असा भरा 11 वी प्रवेश फॉर्म…..ही आहे लिंक..आणि प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक…
मुंबई 11 वी ची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून दिलेल्या लिंक वर जाऊन प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे.
राज्यातील सर्व महाविद्यालयात अकरावीचा प्रवेश केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने होणार असून, यासाठी १६ ऑगस्टपासून अर्ज दाखल करण्यास सुरवात होत आहे. मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर या महापालिका क्षेत्रातील अकरावीच्या प्रवेशासाठी ही ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कळविले आहे.
नोंदणी व अर्ज भरण्याची सुविधाच मुदतवाढ करत १६ ऑगस्टपासून सूरू करण्यात येत आहे.विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याचा सराव व्हावा म्हणून मॉक डेमोची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही सुविधा शुक्रवार (ता.१३) पर्यंत उपलब्ध असेल. त्यानंतर सर्व माहिती नष्ट होईल आणि १६ तारखेनंतर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रवेश अर्ज भरण्यात येईल.
असे आहे प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक
(फक्त संबंधित महापालिका क्षेत्रांसाठी)
कार्यवाहीचे टप्पे – कालावधी , कोण करणार
१) अ) संकेतस्थळावर विद्यार्थ्याने ऑनलाइन नोंदणी करणे. लॉगईन आयडी व पासवर्ड तयार करणे. ब) अकरावी प्रवेश अर्जाचा भाग एक आणि शुल्क भरणे क) अर्जातील माहिती शाळा किंवा मार्गदर्शन केंद्रातून प्रमाणित करणे, शाळा निवडणे आणि अर्ज व्हेरिफाईड झाल्याची खात्री करणे ः १६ ऑगस्टपासून (हे विद्यार्थ्यांनी पालकांच्या मदतीने करावे)
२) विद्यार्थ्यांच्या प्रवेश अर्जातील माहिती भाग-१ ऑनलाइन तपासून प्रमाणित करणे : १७ ऑगस्टपासून (माध्यमिक शाळा किंवा मार्गदर्शक केंद्रांनी करावे)
महत्त्वाचे काय?
– सराव म्हणून संकेतस्थळावर १३ तारखेच्या आत डेमो अर्ज भराल
– यात अडचण आल्यास आपल्या शाळेशी संपर्क साधा
– १३ तारखेनंतर हे अर्ज नष्ट होतील
– पालकांच्या मदतीने प्रत्यक्ष अर्ज १६ तारखेपासून भरावे
अर्ज दाखल करण्यासाठीचे संकेतस्थळ –
https://11thadmission.org.in/






