sawada

सावदा पोलिसांचे गावठी दारू निर्मीती अड्ड्यांवर धाडसत्र सपोनि इंगोले यांची धाडसी कारवाई १४००० हजारांचे गावठी दारुचे रसायन केले नष्ट..

सावदा पोलिसांचे गावठी दारू निर्मीती अड्ड्यांवर धाडसत्र सपोनि इंगोले यांची धाडसी कारवाई १४००० हजारांचे गावठी दारुचे रसायन केले नष्ट..

मुबारक तडवी सावदा

Savada : सावदा पोलीस स्टेशन हद्दीतील सातपुड्याच्या कुशीतील जानोरी गावी भवानी नाल्याच्या काठी सपोनि देविदास इंगोले व पोउपनी राजेंद्र पवार यांनी पथकासह गावठी दारूच्या भट्ट्यावर धाड टाकून धडक कारवाई करण्यात आली आहे . सावदा पोलीस स्टेशन हद्दीत जानोरी गावी भवानी नाल्याच्या काठी सपोनि देविदास इंगोले व पोउनि राजेंद्र पवार यांनी पथकासह गावठी दारूच्या भट्ट्यावर धाड टाकून सुमारे १४००० / -रु किमतीचा ७०० लिटर गुळ व मोह मिश्रित कच्चे रसायन २०० लिटर मापाच्या प्लास्टिक च्या ७ टाक्या मध्ये भरलेले रसायन जागेवरच सांडून टाक्या तोडून फोडून नाश केल्या व या बाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सहाय्यक पोलीस उप निरीक्षक देविदास इंगोले हे गेल्या काही दिवसांपूर्वी सावदा पोलिस स्टेशनला रुजू झाले असता आल्याआल्याच त्याची ही पहिलीच कारवाई असून अवैध व्यावसायिकांवर ही कारवाईची सुरुवात खेड्या पासून सुरू होऊन शहरा पर्यंत व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button