Nashik

नाशिक करोनामुक्त करण्यासाठी शिवसेना कटीबद्ध

नाशिक करोनामुक्त करण्यासाठी शिवसेना कटीबद्ध अजय बोरस्ते.

नाशिक जिल्हा प्रतिनिधी शांताराम दुनबळे

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री , शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिक शहरात शिवसेना नगरसेवकांच्या माध्यमातुन पन्नासहुन अधिक आरोग्य शिबीरांचे आयोजन करण्यात आले . गेल्या सात दिवसंपासून सुरु असलेल्या या आरोग्य शिबिरांमध्ये २३६०० अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली . असून पुढील आठवड्यात एक लाखाहून अधिक नागरिकांच्या आरोग्य चाचण्या करून शहराला लवकरात – लवकर करोना मुक्त करण्याचा संकल्प आला आहे . दरम्यान शिवसेनेच्या आरोग्य तपासणी शिबिरात आतापर्यंत शेकडो करोनाचे रुग्ण आढळून आल्यामुळे संबंधित लोकांचे वेळीच प्राण वाचले आहे . करोना संसर्ग या विषयी असणारे गैरसमज व भीती करण्यासाठी शिवसेना नगरसेवक पदाधिकारी , शिवसैनिक रस्त्यांवर उतरून लोकांमध्ये जनजागृतीकरीत आहेत . या आरोग्य शिबिरांबरोबर करोना रॅपिड टेस्ट , रक्तदान शिबीर , सेनिटायझर व मास्क वाटप , आर्सनीक आल्बम ३० या रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले . शिवसेना नगरसेवक आर . डी . धोंगडे यांच्या कार्यालयात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . या शिबिरात लोकांची टेम्प्रेचर टेस्ट ऑक्सिजन लेवल टेस्ट , ब्रिदिंग टेस्ट , ब्लड प्रेशर टेस्ट व करोना संसर्ग आढळल्यास संबंधितांची करोना रॅपिड टेस्ट करण्यात आल्या . या प्रसंगी जिल्हाप्रमुख विजय करंजकर , विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते , माजी आमदार योगेश घोलप , राजू लवटे , नगरसेवक सूर्यकांत लवटे आदी उपस्थित होते . प्रभाग क्रमांक १७ चे नगरसेवक प्रशांत दिवे व नगरसेविका मंगलाताई आढाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात या आरिजि शिबिरात लोकांची टेम्प्रेचर टेस्ट , ऑक्सिजन लेवल टेस्ट , ब्रिटिंग टेस्ट , ब्लड प्रेशर टेस्ट , व करोना संसर्ग आढळल्यास संबंधितांची करोना रॅपिड टेस्ट करण्यात आल्या असून आर्सनीक आल्बम ३० या गोळ्यांचे वाटप करण्यात आले .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button