Nashik

दिंडोरी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी ठार

दिंडोरी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी ठार

सुनिल घुमरे नाशिक

नाशिक : दिंडोरी शहरातील नाशिक कळवण रोडवर जनता विद्यालयाच्या समोर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने पादचारी ठार झाला,
सविस्तर वृत्त असे की मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या अनोळखी व्यक्तीस अज्ञात वाहनाने धडक दिली, तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी 108 रुग्णवाहिका सहाय्याने नाशिक ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता अनोळखी व्यक्तीच्या पायास, डोक्यास मार लागल्याने उपचार चालू असताना त्याचा मृत्यू झाला, दिंडोरी पोलीसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अनोळखी व्यक्तीचे वय 60 वर्षे असून अंगात पांढऱ्या रंगाचे मळकट स्वेटर, काळ्या रंगाची पॅंट, घातली असून पुढील तपास दिंडोरी पोलिस करीत आहेत,

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button