Maharashtra

लॉयन्स ग्रुपच्या दत्तकगाव चांप्यात कोरोना वारीयर्स डॉक्टरांचा सत्कार

लॉयन्स ग्रुपच्या दत्तकगाव चांप्यात कोरोना वारीयर्स डॉक्टरांचा सत्कार

प्रतिनिधी अनिल पाटील

चांपा, ता,1:येथे आंतरराष्ट्रीय अससोसिशन ऑफ “लॉइन्स क्लब ,”नागपूर स्मार्ट सिटी ग्रुपतर्फे आज उमरेड तालुक्यातील चांपा हे गाव दत्तकगाव घेतल्याचे लॉइन्स क्लब ने जाहीर केले व सोबतच लॉइन्स क्लब ,”नागपूर स्मार्ट सिटी यांचे दत्तकगाव चांपा येथे दत्तकगाव चांपा बोर्डाचे अनावरण चांपा ग्रामपंचायतच्या परिसरात रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार कृपाल तुमाने यांच्या हस्ते करण्यात आले ,यावेळी उपस्थितीत लॉइन्स क्लब च्या अध्यक्षा सौ.ऍड संगीता साबळे यांच्या अध्यक्षतेखाली आज चांपा ग्रामपंचायत परिसरात खासदार कृपाल तुमाने यांच्या हस्ते वृक्षलागवडीस सुरवात करण्यात आली.

नागपूर स्मार्ट शहराच्या विकासासोबतच प्रदूषण आणि तापमानात नियंत्रण ठेवण्यासाठी लॉइन्स क्लबतर्फे वृक्षलागवडीस सुरवात केली आहे.लॉइन्स क्लबने चांपा गाव दत्तक घेतले असून शहरात मोठ्या प्रमाणात रस्ते ,आदी गावाचे विकासकामांना गती देण्यासाठी सरपंच अतिश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चांपा गावाला आदर्श गाव बनविण्याचा संकल्प लॉइन्स क्लब पूर्ण करणार असल्याचे मत लॉइन्स क्लब च्या अध्यक्षा सौ.ऍड संगीता साबळे यांनी व्यक्त केले .

ग्रामपंचायत चांपा व लॉइन्स क्लब ऑफ स्मार्ट सिटी नागपूर, यांच्या संयुक्त विद्यमाने “डॉक्टर्स डे” निमित्त (पाचगाव) चांपा क्षेत्रातील कोरोना वारीयर्स सोबतच वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे डॉ अशोक कासटवार ,डॉ दिलीप अर्जुने, डॉ सौ प्रतिमा ढोले, डॉ कमलेश रावते आदी डॉक्टरांचा सत्कार शाल श्रीफळ पुस्पगुच्छ रोपटं देऊन मा. खासदार कृपालजी तुमाने साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सौ ऍड संगीता साबळे होत्या ,तर कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून पूर्व प्रांतपाल विजय पालिवाल, कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती म्हणून खासदार कृपाल तुमाने होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रोजेक्ट डायरेक्टर डॉ रोहित माडेवार,झोन चेअरमन वासू ठाकरे, प्रफुल इटकेलवार, व इतर”लॉइन्स क्लब ,”नागपूर स्मार्ट सिटीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी ग्राम पंचायत चांपा येथील सरपंच अतिश पवार, उपसरपंच अर्चना सिरसाम , ग्राम सचिव बी बी वैद्य, व इतर ग्राम सदस्य आदींच्या उपस्थितीत”डॉक्टर्स डे” निमित्त चांपा क्षेत्रातील कोरोना वारीयर्सचा सत्कार समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला व तसेच कोरोना प्रतिबंधित उपाययोजना म्हणून चांपा येथील ग्रामस्थांना आर्सेनिक अल्बम या होमेओपेथी औषधी वाटप , वृक्षारोपण , मास्क व सैनिटाइजर वितरण करण्यात आले, आदी विविध कार्यक्रमांनी “डॉक्टर्स डे” उत्साहात साजरा करण्यात आला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button