Mumbai

जळगांव, नाशिक,नंदुरबारमध्ये येत्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस.. हवामान खात्याचा इशारा…!

जळगांव, नाशिक,नंदुरबारमध्ये येत्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस.. हवामान खात्याचा इशारा…!

मुंबई गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने महाराष्ट्राला चांगलंच झोडपून काढले आहे. कोकण, कोल्हापूर, सांगली, सातारा, अकोला, अमरावती, नांदेड अशा अनेक ठिकाणी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. परंतु पुढचे काही दिवस पाऊस राज्यात विश्रांती घेईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील पाच दिवसांमध्ये राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला नाही.

नंदूरबारमध्ये मुसळधार तर नाशिक,जळगाव, पुणे आणि साताऱ्यातील घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाच्या सरी कोसळू शकतात, असे टि्वट हवामान विभागाचे ज्येष्ठ अधिकारी के.एस.होसाळीकर यांनी केले आहे. २६ जुलै रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडेल. २७ आणि २८ जुलै रोजीदेखील कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात सर्वसाधारण वरीलप्रमाणे वातावरण राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पुढील पाच दिवसात मुंबईला कोणताही अ‌लर्ट दिलेला नाही. मुंबईसाठी ही दिलासा देणारी बाब आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, २८ तारखेनंतर राज्यात पाऊस पुन्हा सक्रीय होईल. कारण २८ जुलैला बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या महाराष्ट्रातील कमी दाबाचा पट्टा हा कर्नाटककडे सरकला आहे. त्यामुळे राज्यातील पावसाचा जोर तुर्तास ओसरेल असा अंदाज आहे.

जळगांव, नाशिक,नंदुरबारमध्ये येत्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस.. हवामान खात्याचा इशारा...!

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button