Jalgaon

?️दंगल राजकारणाची..गिरीष महाजन यांची ती वादग्रस्त सिडी आणि पेनड्राईव्ह माझ्याकडे आहेत… पण ?

?️दंगल राजकारणाची..गिरीष महाजन यांची ती वादग्रस्त सिडी आणि पेनड्राईव्ह माझ्याकडे आहेत… पण ?

जळगाव : माजी मंत्री गिरीश महाजन यांनी आपला छळ केला आहे. तीन वर्षापूर्वी ते मंत्री असल्याने त्यांचा दबाव होता. त्यामुळे पोलीसांनी आपली तक्रार घेतली नसती याची आपल्याला जाणीव होती. त्यामुळे आज गुन्हा दाखल केला आहे. मात्र या सर्व गुन्ह्याचे आपल्याकडे पुरावे आहेत. एवढेच नव्हे तर त्यांच्या कृत्याच्या आपल्याकडे ‘सीडी’आहेत वेळ आल्यास आपण त्याही दाखविणार आहोत. असे मत तक्रारदार अॅड विजय भास्कर पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले आहे.

जळगावातून पुणे येथे बोलावून आपल्याला चाकूचा धाक दाखवून मारहाण केल्या प्रकरणी माजी मंत्री भाजप नेते गिरीश महाजन यांच्यासह २९ जणांविरूद्ध विजय पाटील यांनी तक्रार दाखल केली आहे.यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली.
जळगाव नगरपालिकेतील देशभर गाजलेल्या घरकुल गैरव्यवहार प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात माजी नगरसेवक (कै.)नरेंद्र भास्कर पाटील यांनी पाठपुरावा केला होता. यात सर्व आरोपीना शिक्षाही न्यायालयाने ठोठावली आहे, याच (कै.)नरेंद्र पाटील यांचे विजय पाटील हे भाऊ आहेत. माजी मंत्री महाजन यांनी आपल्या विरोधात हा खोटा गुन्हा दाखल केला आहे, तसेच तक्रारदार पाटील यांच्या मागे कुणतरी राजकीय सुत्रधार असल्याचा आरोप केला आहे.

मंत्री महाजन यांच्या आरोपाला उत्तर देण्यासाठी पाटील यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. ते म्हणाले, कि सन २०१८ पासून तर आजपर्यंत घडलेल्या गुन्हाचे क्रमावर घटनाक्रम आपण दिले आहेत त्यामुळे तीन वर्षापूर्वी हा गुन्हा घडला असला तर आजपर्यंत त्यांच्याकडून छळ सुरूच होता. ‘मराठा विदयाप्रसारक संस्थेचे कागदपत्र घेण्यासाठी आपल्याला पुणे येथे बोलावून सन २०१८ मध्ये त्यांनी आपल्याला पुण्यात मारहाण केली. त्यावेळी आपण तक्रार दिली असती तर त्यावेळी सरकारमध्ये ते मंत्री असल्याने त्यांच्या दबावाखाली पोलिसांनी ती तक्रारी घेतली नसती. त्यामुळे आता या प्रकरणी आपण गुन्हा नोंदविला आहे. या घटनेचे आपल्याकडे संपूर्ण पुरावे आहेत. आपण पोलीसांना देणार आहोत.

महाजनांची मविप्र वर नजर

मराठा विद्याप्रसारक संस्थेचा हा वाद आहे. या संस्थेशी आपला संबंध नसल्याचे महाजन यांनी म्हटले आहे.त्याला उत्तर देतांना पाटील यांनी म्हटले आहे, कि संस्थेच्या मोठ्या प्रमाणावर जागा आहेत त्याची किंमत एक हजार कोटी आहे. त्या जागेवर संकुल बांधून त्या विक्रीचा घाट महाजन यांचा होता. त्यामुळे आम्हाला सत्तेवरून हटवून त्यांनी आमच्या विरोधकांच्या ताब्यात ही संस्था देण्यासाठी त्यांनी आमचा अक्षरश: छळ केला आहे. जिल्ह्यातील अमळनेर,चाळीसगाव व पहूर येथील संस्थेच्या जागाही त्यांनी अशाच पध्दतीने लाटल्या आहेत. तोच प्रकार या संस्थेत करण्यासाठी त्यांना ही संस्था हवी होती.

महाजनांच्या कृत्याच्या ‘सीडी’..?

माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या ‘सीडी’असल्याची जोरदार चर्चा आहे. त्याबाबत बोलतांना विजय पाटील म्हणाले, की महाजन म्हणतात दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी मोबाईल रेकॉर्ड पोलीसानी तपासावे, यांच्याशी आपण सहमत आहोत. पोलीसांनी खरेच त्यांच्या व आमच्या त्या कालावधीतील मोबाईल रेकार्ड तपासावे. सत्य निश्‍चित समोर येईल. आमच्याकडे महाजनांच्या विरूद्धचे सर्व पुरावे आहेत. त्यांच्या चर्चेत असलेल्या ती सीडी तसेच पेन ड्राईव्ह आहेत. वेळप्रसंगी आपण तेही दाखविणार आहोत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button