Amalner

?️ Breaking News…अकार्यक्षम अधिकारी असल्याचा आरोप करत अमळनेर उपविभागीय अधिकारी यांच्या बदलीची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस ची मागणी…

Breaking News…अकार्यक्षम अधिकारी असल्याचा आरोप करत अमळनेर उपविभागीय अधिकारी यांच्या बदलीची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस ची मागणी…

नूरखान

अमळनेर : येथील कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. ढिसाळ,सुस्त प्रशासन आणि वशिलेबाजी मुळे शहरात कोरोनाचा संसर्ग वाढतच चालला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी विद्यार्थी काँगेसच्या पदाधिकाऱ्यांनी अमळनेर उपविभागीय अधिकारी यांच्या बदलीची मागणी केली असून उपविभागीय अधिकारी अकार्यक्षम असल्याचा आरोप केला आहे.या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे ऑनलाइन तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अपळनेर उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे या कोरोना आटोक्यात आणण्यासाठी
तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी
आणण्यासाठी अकार्यक्षम ठरल्या आहेत. २२ मार्च रोजी पहिले लॉकडाऊन जाहीर झाले त्यात नियोजन नाही,वशिलेबाजी करत काही प्रतिष्ठित ये – कार्यक्षम अधिकारी त्यावेळी कुठलेही ये जा करत होते. नियोजनशून्य कारभार,वशिलेबाजी, बाहेरून येणाऱ्या लोकांवर नियंत्रण ठेवले नाही त्यामुळे कोरोना संसर्ग वाढला.

नागरिकांमध्ये प्रशासकीय वचक ,धाक राहिला नाही.अति गम्भीर रुग्णांना पासेस साठी मोठ्या प्रमाणात त्रास दिल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.प्रत्येक लॉक डाऊन चा शहरात फज्जा उडाला ,कोणतेही महत्वपूर्ण निर्णय घेतले नाहीत,नियमभंग करणाऱ्यांवर कोणतीही ठोस कार्यवाही केली नाही,उपविभागीय अधिकारी यांची जनतेवर आणि प्रशासनावर पकड नाही तरी तालुका कोरोना मुक्त होण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांची बदली करावीआणि कार्यक्षम अधिकारी ची नियुक्ती करावी अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँगेसचे जळगांव जिल्हाउपाध्यक्ष भूषण भदाणे,तालुकाध्यक्ष श्रीनाथ पाटील,शहराध्यक्ष सुनील शिंपी ,गौरव पाटील, अनिरुद्ध शिसोदे, सनी गायकवाड इ नी ऑनलाईन तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे दाखल करून केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button