Amalner

तालुका स्तरावरील समितीने गरीब व गरजू असलेल्या नागरिकांना उद्या पासून शिव भोजन

तालुका स्तरावरील समितीने गरीब व गरजू असलेल्या नागरिकांना शिव भोजन उपलब्ध करून देण्यासाठी दोन सक्षम भोजनालय चालकाची निवड करण्यात आली आहे.

योगेश पवार
अमळनेर

शासन परिपत्रकानुसार ६ जानेवारी ते १८ जानेवारी २०२० दरम्यान शिव भोजन सुरू व्हावे या करिता टेंन्डर प्रस्ताव मागविण्यात आले होते.
त्याअनुषंगाने मा. जिल्ह्याधिकारी जळगांव , यांच्या कडील पत्रानुसार अमळनेर तालुका समितीच्या दि.१७ एप्रिल २०२० रोजीच्या बैठकीनुसार दोन सक्षम भोजनालय चालकाची निवड करण्यात आली आहे. व कोरोना विषाणूच्या पार्श्र्वभूमीवर शिव भोजनालयात येणा-या गरीब व गरजू लाभार्थींना मूल्य ५ रुपये दर ठेवण्यात आला आहे.

साई रेस्टॉरंट, बस स्थानक जवळ अमळनेर (भोजन चालक- संदीप विश्राम पाटील ) तसेच श्रीनाथ खानावळ ,धुळे रोड ,कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ अमळनेर (भोजन चालक- घन:श्याम चंदूसिंग परदेशी) या दोन भोजन चालकांना दररोज शासनाच्या इष्टकांनुसार ७५ थाळी मंजूरी संख्या देण्यात आली आहे.
अश्या दोन ठिकाणी शिव थाळी भोजनालयाचा उद्या दि २२ एप्रिल २०२० रोजी पासून शुभारंभ होत आहे. अमळनेर तहसीलदार मा. मिलिंंदकुमार वाघ यांनी सांगितले की, गरीब गरजूंसाठी हा शिव थाळी भोजन आहार असून त्यांनी याचा अवश्य लाभ घ्यावा अशी माहिती देण्यात आली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button