Maharashtra

सावदा शहरातील खाजानगर भागात ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती.

सावदा शहरातील खाजानगर भागात ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती.

सावदा प्रतिनिधी युसूफ शहा

शहरातील खाजानगर भागातील गट क्रमांक १२३३मदिना भागात दरवर्षी एप्रिल, मे, महिन्यात घरातील नळाला पाणी पुरवठा सुरळीत मिळत नाही. त्यामुळे इकडिल महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते. यंदा शहरात लाकडाऊन आहे. त्यातच पवित्र रमजान महिना असून आम्हाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत होत नाही. नियमित पाणीपुरवठा मिळावा म्हणून येथील रहिवासी, नगरसेवक फिरोजखान पठाण, अँड जावेद शेख, हुसेनभाइ आदि नागररीकांचे सह्या करून मुख्याधिकारी सौरभ जोशी यांचे कडे मागणी केली आहे..
निवेदनात म्हटले आहे की, दरवर्षी एप्रिल व मे महिन्यात खाजानगर भागातील गट क्रमांक १२३३ मधिल ३० ते४० कुटुंबातील घरांमध्ये नळाला पिण्याचे पाणी येत नाही. येथील प्रश्न दर वर्षीय आहे. दरवर्षी या संदर्भात तक्रार निवेदनाद्वारे नगरपालिकेला कळविले असून येथील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जात नाही. फक्त आश्वासन मिळाले आहेत. यंदा कोविड १९ सारखा विषाणूजंन्य व्हायरस पसरू नये म्हणून शहरात लाकडाऊन आहे त्यातच आमचा पवित्र रमजान महिना असून आमचे रोजे, उपवास सुरू आहेत. घरात पिण्याचे पाणी मिळत नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे घरात भांडणे उद्भवत आहेत. आमचे भागातील नागरिकांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळावे. ग्राहक संरक्षण कायद्यात असलेल्या तरतूदिनुसार सेवेत असलेले कमतरतेची समस्या त्वरित सोडवून येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढला जावा. अशी पंचविस नागरीकाचे सह्यानि लेखी तक्रार मुख्याधिकारी यांचे कडे केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button