Faijpur

फैजपुर नगरपालिकेकडून नाले वरील नवीन चेंबर बसवण्याची मागणी

फैजपुर नगरपालिकेकडून नाले वरील नवीन चेंबर बसवण्याची मागणी

फैजपूर प्रतिनिधी सलीम पिंजारी तालुका यावल

फैजपुर नगरपरिषदेच्या हद्दीतील विश्वरत्न,भारतरत्न,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळील मोठ्या नाली वरील चेंबर पुर्णत खराब झाल्या मुळे त्यात पडुन नागरिकांची जीवित हानी होऊ शकते, पुढील काही दिवसांनी येणाऱ्या श्री. गणेशोत्सव व दुर्गा देवी उत्सव यांच्या मिरवणुका विश्वरत्न,भारतरत्न,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारका जवळुन जात असतात त्या मुळे मिरवणुकी मध्ये मोठ्या प्रमाणावर श्री.गणेश भक्त व दुर्गामाता भक्त, महिला, पुरुष, लहान मुलं यांची खुप मोठी वर्दळ त्याठिकाणी असते, त्यामुळे या ठिकाणी नालीवर फैजपुर नगरपरिषदेने बसवण्यात आलेले चेंबर खुप दिवसापासून जीर्ण झाल्या मुळे त्यामध्ये नागरिक व लहान मुले पडुन मोठया प्रमाणावर जीवितहानी होऊ शकते, मी फैजपुर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी .वैभव लोंढे व बांधकाम विभाग न.पा. फैजपुर यांना विनंती करतो की त्यांनी विसर्जन मिरवणुका निघण्याच्या आत ते जुने जीर्ण झालेले सर्व चेंबर काढुन त्या ठिकाणी नवीन चेंबर लवकरात लवकर बसवावे, व त्या ठिकाणी होणारी जीवित हानी थांबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button