आरोग्याचा मुलमंत्र..भीमसेनी कापुराचे आरोग्यास फायदे
भीमसेन कापूर एक दहनशील व अर्धपारदर्शक पांढरा तुकडा असतो, भीमसेन कापूर ला तीव्र वास आणि आंबट चव असते. ज्याचा वापर मुख्यतः आपण आरती मध्ये करतो मात्र भीमसेन कापूर चे अनेक फायदे आहेत
1.वेदना आणि सूज दूर करण्यासाठी :-
भीमसेन कापूर मध्ये जळजळ कमी करणारे व दाहकविरोधी गुणधर्म असतात जे वेदना आणि सूज दूर करण्यासाठी मुख्यतः वापरले जाते.
भीमसेन कापूर शरीरातील मांसपेशींना सुन्न करते ज्या मुळे शरीरातील वेदना व सूज दूर करून लालपणा सुद्धा कमी करते.
2. नखांच्या बुरशीचे उपचार
ऑन्कोमायकोसिस एक नखांचा रोग आहे ज्यामध्ये बोटांच्या व पायांच्या नखांवर फंगल इन्फेक्शन मूळे बुरशी होते.
ऑन्कोमायकोसिस वर उपचारांसाठी तोंडी अँटी-फंगल दिले जातात परंतु भीमसेन कापूर असलेल्या औषधे ऑन्कोमायकोसिस चा उपचार अधिक वेगाने करतात.
३. झोपायला मदत करते
भीमसेन कापूरच्या मादक व तीव्र सुगंधामुळे मनावर शांत प्रभाव पडतो आणि रात्री चांगली झोप येते. त्यामुळे रोज संध्याकाळी आरतीमध्ये भीमसेन कापूर वापरावा.
भीमसेन कापूरचे तेल असेल तर थोडेसे उशीला किंवा चादरीला चोळावे जेणेकरून तुम्हाला रात्री चांगली झोप येईल व दिवसभरातील तणाव देखील कमी होईलघ्या.
५. सर्दी व खोकल्या वर गुणकारी :-
भीमसेन कापूर सर्दी आणि खोकल्यावर अत्यंत कार्यशील व प्रभावशाली आहे व त्याचसोबत घशातील रक्तसंचयपासून देखील भीमसेन कापूर फायदेशीर आहे.
भीमसेन कापूरचे हे अनेक वापर रब आणि डिकॉन्जेस्टंटचे घटक आहे.
भीमसेन कापूर आपल्या छातीवर आणि मागे भीमसेन कापूर चे तेल काही प्रमाणात घासून घ्या.
६. दम्या वर गुणकारी :-
कापूरच्या तीव्र सुगंधामुळे सतत इनहेलेशन केल्याने श्वसनविषयक त्रास व रोग कमी होतात विशेषत: दमा कमी होऊ शकतो.
डॉ. किशोर बाळासाहेब झुटे पाटील
[ होमिओपॅथिक तज्ञ ]






