भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी के एल चव्हाण यांची नियुक्ती”
सुनिल घुमरे नाशिक
– भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, संघटनमंत्री विजयराव पुरानिक व विभाग संघटन मंत्री किशोरजी काळकर यांच्या मार्गदर्शनाखाली नासिक जिल्हा भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी के एल चव्हाण सर यांची जिल्हा भाजपा अध्यक्ष केदा नाना आहेर यांनी नियुक्ती केली आहे.
यापूर्वी ते जिल्हासरचिटणीसपदी कार्यरत होते.चव्हाण सर हे शिक्षक चळवळीतील कार्यकर्ते असून त्यांनी अनेक शिक्षक संघटनांमधे काम केलेले असून नासिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष पद भुषविले असून सध्या संघाचे मार्गदर्शक आहेत.कनिष्ठ महाविद्यालयीन संघटना,अध्यापक विद्यालय प्राचार्य संघटना व शिक्षक परिषद संघटनेत महत्वाच्या पदांवर त्यांनी काम केले आहे.त्यांना आदर्श मुख्याध्यापक म्हणून अनेक संघटना,संस्थांकडून गौरविण्यात आले आहे.माजी आरोग्यमंत्री डॉ.डी एस आहेर व मा.प्रतापदादा सोनवणे यांच्या प्रत्येक निवडणूकीत त्यांनी निष्ठेने सहभाग घेतलेला आहे.अनेक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांनी न्याय मिळवून दिलेला असून गरजूंना आर्थिक मदतही केलेली आहे.सुभाष सार्वजनिक वाचनालयाला पुस्तके व साहित्य रूपाने मोठी मदत केलेली आहे.ते उत्कृष्ट प्रशासक व शैक्षणिक विषयातील सखोल ज्ञान असलेले एक प्रभावी नेतृत्व अशी त्यांची ख्याती असून भाजपाचे ते निष्ठावंत कार्यकर्ते आहेत.
शिक्षक आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे जिल्हाध्यक्ष केदा नाना आहेर,खा.डॉ.भारती पवार, प्रतापदादा सोनवणे,आ.डॉ.राहूल आहेर,आ.देवयानी फरांदे,आ.राहूल ढिकले,आ.सिमा हिरे,लक्ष्मण सावजी,सुनिल बागूल, सुनील केदार, जिल्हासरचिटणिस प्रा.सुनिल बच्छाव सर,नासिक पश्चिम विधानसभा प्रभारी मा.जगन पाटील,नंदकुमार खैरनार,भुषण कासलीवाल आदींनी के एल चव्हाण त्यांचे अभिनंदन करून भावीवाटचालीस शुभेच्छा दिल्या.?






