अमळनेर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
तालुक्यात विविध सामाजिक संघटना तर्फे अभिवादन
अमळनेर–थोर विचारवंत, कवी,कलावंत,प्रबोधनकार, साहित्यिक व समाजसुधारक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 52वी पुण्यतिथी निमित्त संपूर्ण भारतभर त्यांना अभिवादन करण्यात आले.अमळनेर शहरातील धुळे रोडवरील असलेल्या स्मारक वरील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला आमदार अनिल पाटील व माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी बहुजन रयत परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश बोरसे,तालुकाध्यक्ष सुरेश कांबळे,पत्रकार आणि आदिवासी एकता संघर्ष समिती संस्थापक प्रदेशाध्यक्षा प्रा जयश्री दाभाडे,समता समितीचे अध्यक्ष समाधान मैराळे, भीम आर्मी चे तालुकाध्यक्ष प्रवीण बैसाणे सह विविध सामाजिक संघटनातर्फे यावेळी अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी चर्चात्मक संवाद साधत अनुसूचित जाती जमाती तील व्यक्तिंवर होणारे अन्याय थांबविण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन कार्य करणे आवश्यक आहे. तसेच शहरातील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब सोनवणे, आत्माराम अहिरे,पत्रकार अजय भामरे सर,मांडळ चे ग्रामपंचायत सदस्य मंगलदास कांबळे,बहुजन रयत परिषदेचे हरीचंद्र कढरे,नारायण गांगुर्डे,राजू कांबळे,जितू कढरे, अनिल मरसाळे, किरण संदानशिव, राकेश खैरनार,सोनू संदानशिव आदी कार्यकते यावेळी उपस्थित होते.






