आ.सचिन कल्याणशेट्टी यांची ग्रामीण रुग्णालयाला भेट
कृष्णा यादव, प्रतिनिधी अक्कलकोट
अक्कलकोट दि.25:- अक्कलकोटचे विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली सर्व प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. आपल्या डॉक्टरांनी या महामारी संबंधित येणारे सर्व धोके लक्षात घेऊन सर्व तयारी व्यवस्थित केल्याचे सांगितले.
खाजगी डॉक्टरांना सुद्धा स्वतःचा दवाखाना बंद ठेवून ग्रामीण रुग्णालयात सेवा देत असल्याबद्दल सर्व डॉक्टरांचे कौतुक केले. मी दिवसभर याच विषयावर सर्वांच्या भेटी घेत आहे. तालुक्यात समाधानकारक तयारी असल्याचे निदर्शनास आले आहे. आपण सगळे या कोरोनाचा मुकाबला निश्चितच करू शकतो असा आत्मविश्वास देत कोणीही अफवांवर विश्वास न ठेवता स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेऊ या. या आजारापासून दूर ठेवण्यासाठी कोरोना व आपल्यात खंबीर भिंत म्हणून उभे असणाऱ्या देवदूत डॉक्टरचे व प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानण्यास सांगितले. कोरोनासोबत लढायचे असेल तर रस्त्यावरची लढाई न लढता सर्वांनी घरी बसूनच लढाई लढून आम्हाला या महामारीच्या युद्धात विजय मिळवायचा आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व जनतेस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन आ.सचिन कल्याणशेट्टी केले आहे.






