Kolhapur

कोजिमाशिच्यावतीने कोरोनावर मात केलेल्या सभासदाना मदत धनादेश वाटप समारंभ संपन्न

कोजिमाशिच्यावतीने कोरोनावर मात केलेल्या सभासदाना मदत धनादेश वाटप समारंभ संपन्न

सुभाष भोसले कोल्हापूर

कोल्हापूर : कोजिमाशि च्या वतीने एक हात मदतीचा या उपक्रमाअंतर्गत कोरोनावर मात केलेल्या सभासदाना मदत धनादेश वाटप हा कार्यक्रम सत्काराचा नसून आमच्या कुंटुबातील शिक्षक सभासदाना दिलासा देणारा आहे .कोरोनाच्या संकटावर मात करून आपण आलात त्यामुळे खरोखरच आपण योध्दे आहात .
असे प्रतिपादन शिक्षक नेते दादासाहेब लाड यांनी केले.
कोजिमाशि कागल शाखेच्यावतीने एक हात मदतीचा या उपक्रमाअंतर्गत कोरोनावर मात केलेल्या सभासदाना मदत धनादेश वाटप समारंभ कार्यक्रम येथील श्रीमंत अजितसिंह घाटगे सांस्कृतिक सभागृहात संपन्न झाला. शिक्षक नेते दादासाहेब लाड व नुतन अध्यक्ष बाळ डेळेकर, कागल शाखा चेअरमन गंगाराम हजारे, कैलास सुतार, अनिल चव्हाण, प्रा . एच. आर.पाटील आदींच्या प्रमुख उपस्थितीत धनादेश वाटप करण्यात आले.
स्वागत मुख्याध्यापक आर. व्ही. किणेकर व
प्रस्ताविक कागल शाखा चेअरमन गंगाराम हजारे यांनी केले. यावेळी मुख्याध्यापक शिवाजीराव चौगुले, विलास भानुसे यांनी मनोगत व्यक्त केले. आभार एस. एस. पाटील यांनी मानले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद पाटील, प्रशासन अधिकारी उत्तम कवडे, मुख्याध्यापक अशोक बुगडे, प्राचार्य जे. डी. पाटील, उपप्राचार्य बी के मडिवाळ,एस. डी. पाटील, नंदू कांबळे, अर्जुन पाटील, शाखाधिकारी अनिल पाटील, प्रशांत मोरबाळे, प्रशांत गुरव, मंगेश पाटील, एस.बी. गुरव आदींसह शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button