Mumbai

व्हायरल कट्टा..अंतर्वस्त्र वापरणे यावरून मराठी अभिनेत्री हेमांगी कवीवर टीकेची झोड..पहा  हेमांगी कवीने काय दिले रोखठोक उत्तर..वाचलीच पाहिजे अशी पोस्ट..

व्हायरल कट्टा..अंतर्वस्त्र वापरणे यावरून मराठी अभिनेत्री हेमांगी कवीवर टीकेची झोड..पहा हेमांगी कवीने काय दिले रोखठोक उत्तर..वाचलीच पाहिजे अशी पोस्ट..

मुंबई मराठी/हिंदी चित्रपट,मालिका,नाटक यात आपल्या अभिनयाच्या जोरावर ठसा उमटविणारी अभिनेत्री हेमांगी कवी सध्या सोशल मिडिया वर ट्रोल होत आहे. अत्यन्त गुणी अभिनेत्री म्हणून हेमांगी लोकप्रिय आहे. उत्कृष्ट अभिनय आणि मेहनत या जोरावर तिने आपली ओळख निर्माण केली आहे. ती सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय असते. अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. आता देखील तिने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे आणि त्यावर तिला जोरदार टिकेला सामोरे जावे लागले आहे. पण हेमांगीने एक पोस्ट शेअर करत या नेटकऱ्यांची बोलती बंद केलीय.सडेतोड उत्तर तिने टिका करणार्यांना दिले आहे.तर याबाबत सविस्तर माहिती अशी की हेमांगी कवीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर “गोल पोळ्याचं गुपित!” असं कॅप्शन देत एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओवर काही नेटकऱ्यांनी तिला वाईट शब्दात ट्रोल केलं आहे. पण हेमांगीने तिच्या इन्स्टास्टोरीवर एक पोस्ट शेअर केलीय. यात हेमांगी कवीने कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांना चांगलंच सुनावलं आहे.

ती म्हणते “हो मला स्तन आहेत. त्याला स्तनाग्रेही आहेत अगदी पुरुषांसारखी! जसे चालताना माझे हातपाय हलतात तसचे काम करताना माझे स्तन हलतात. कारण मी सस्तन प्राणी आहे. मादी आहे! ज्यांचे हलत नाहीत अशांना माझा त्रिवार सलाम. आता मी घरात, बाहेर, सोशल मीडियावर अंर्तवस्त्र (ब्रा) घालायची कि नाही ही माझी पंसत आहे.या व्हिडीओत दिसणारे माझे स्तन आणि स्तनाग्रे, त्यावरून मला जज करण्याचा, अश्लिलतेचा, माझ्या संस्कारांचा माझ्या बुद्धीमत्तेचा, माझ्या इमेज विषयी घाणेरड्या चर्चा, गॉसिप करून जो काय संबध जोडताय ती तुमची पसंती” असं म्हणत हेमांगीने टीकाकारांचा समाचार घेतलाय.याशिवाय हेमांगीने तिच्या इन्स्ट स्टोरीच्या पोस्टमध्ये तळटीप देत “मला डायरेक्ट मेसेज करून माझ्या विषय काळजी दाखवणाऱ्या हितचिंतकांनो..चिल… या एवढ्या चिंधी गोष्टीवरुन मला अनफॉलो करावसं वाटतं असेल तर खुशार करावं. विचित्र विचारांचे फॉलोअर्स नसलेलं कधीही चांगल”अस तिने म्हटले आहे.

हेमांगीच्या या सडेतोड उत्तराची सर्वांकडून वाह वाह होत आहे. एक स्त्री तिच्या मना प्रमाणे आजही जगू शकत नाही का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तुम्ही फक्त 22 व्या शतकाच्या गप्पाच मारणार का? ती बिकिनी घालते तेंव्हा तुमचं मनोरंजन होत पण जेव्हा ती ब्रा न घालता तीच काम करत असेल तर लोकांना काय प्रॉब्लेम आहे? आपल्या घरातही आपली आई बहीण वहिनी इतर नाते संबंधातील महिला स्वयंपाक घरात विना दुपट्टा,विना पदर काम करतात मग तुम्ही तेंव्हा स्वयंपाक घरात जाता तेंव्हा तिला अश्या अश्लिल भाषेचा उपयोग करणार का?असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत. असो पण हेमांगीने स्पष्ट भाषेत टिकाकरांचा समाचार घेतल्याने त्यांचे तोंड बंद झाले आहे एव्हढे निश्चित..!

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button