नेहरू युवा केंद्राकडून सोशल डिस्टिंगशिंग नियमच तंतोतंत पालन
परंडा तालुका प्रतिनिधी सुरेश बागडे दि.०४
कोरोना संसर्ग पार्श्वभूमीवर देशात संचारबंदी काळ चालू आहे नागरिकांनी अकारणांस्तव घराबाहेर पडू नये,सोशल डिस्टिंगशिंग पाळावा.
याप्रमाणेच परंडा तालुक्यातील कपिलापुरी येथे प्रशासनाच्या नियमाचे उल्लंघन न करता अत्यावश्यक सेवा पुरवल्या जात आहेत. गावातील किराणा दुकाने, वॉटर प्लँट,स्वस्त धान्य दुकान,ग्रामपंचायत,कोरोना संसर्ग सहाय्यता कक्ष इ.अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या ठिकाणी सोशल डिस्टिंगशिंग नियमच तंतोतंत पालन केले जात आहे.त्याचप्रमाणे गावातील कोरोना सहाय्यता कक्ष अधिकारी शिक्षक,ग्रामसेवक,सरपंच,नेहरु युवा स्वयंसेवक इ च्या सहकार्याने गाव निर्जंतुकिकरण फवारणी,गावात कोणी नवीन व्यक्ती आली का याची नोंद, गावात कोण आजारी किंवा कोरोना संसर्ग लक्षणे असल्याचे दिसून येते का,अत्यावश्यक कामास्तवच घरा बाहेर पडाव याबाबत प्रशासनाच्या सूचनाप्रमाणे काटेकोर अंमलबजावणी होत आहे.कोरोना सहाय्यता कक्षातील शिक्षकांनकडून स्पिकरद्वारे गावकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन होत आहे.यासाठी गावातील नेहरू युवा केंद्राचे युवक परिश्रम घेत आहेत.






