Amalner

Amalner: शहर विकास योजनेबाबत अधिकाऱ्यांनी केले मार्गदर्शन..!जाणून घेतल्या समस्या..!

Amalner: शहर विकास योजनेबाबत अधिकाऱ्यांनी केले मार्गदर्शन..!जाणून घेतल्या समस्या..!

अमळनेर( प्रतिनिधी ) शहराच्या सुधारित विकास योजनेबाबत पालिकेत झालेल्या बैठकीत नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. यात लोकप्रतिनिधी व नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी ही बैठक घेण्यात आली.

अमळनेर शहरातील मूळ आणि वाढीव हद्दीची सुधारीत प्रारूप विकास योजना तयार करण्याचे काम प्रगतीपथावर असून विकास योजनेबाबत नगरपरिषद क्षेत्रातील विविध स्तरावरील समस्या व भविष्यातील अपेक्षित सोयी-सुविधांबाबत जाणून
घेण्यासाठी शहरातील लोकप्रतिनिधी सामान्य नागरिक यांच्या उपस्थितीत बैठक नुकतीच नगर परिषद सभागृहात पार पडली.

यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी राजेश पाटील, सहायक संचालक, नगर रचना शाखा जळगाव, दिव्यांक सोनावणे, प्रभारी नगररचनाकार, दिगेश तायडे, सहायक नगर रचनाकार, शुभम आडकर,रचना सहायक, सूरज सूर्यवंशी अर्बन प्लॅन आर्वी असोसिएट हैद्राबाद, नितीन सावंत, जी आय एस एक्स्पर्ट, आर्वी असोसिएट हैद्राबाद आदींसह मुख्याधिकारी प्रशांत सरोदे उपस्थित होते.

या बैठकीस माजी नगराध्यक्ष विनोद पाटील, मुंदडा फाऊंडेशन चे प्रकाश मुंदडा, उद्योगपती प्रवीण साहेबराव पाटील, बिल्डर सरजू गोकलानी,नगरसेवक शेखा हाजी पठाण, रामदास निकुंभ,नीरज अग्रवाल, महेश देशमुख, लालचंद सैनानी, मनोज पाटील, राजेंद्र पाटील, राजेश यादव,दीपक संदानशिव, दिलीप पाटील,नरेंद्र
देशमुख, योगेश देशमुख, बबली पाठक, अनिल महाजन, लोटन चौधरी, प्रा अशोक पवार तसेच उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड ,प्रशासन अधिकारी संजय चौधरी, अभियंता विकास बिरारी, अमोल भामरे, महेश जोशी, अविनाश संदानशिव,सोमचंद संदानशिव आदीसह कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button