Maharashtra

महाराष्ट्र राज्य पञकार संघ ,मुंबई .कोरोना योद्धा म्हणून

महाराष्ट्र राज्य पञकार संघ ,मुंबई .कोरोना योद्धा म्हणून वार्तापञ शोधांश पञकारचे मुख्य संपादक डॉ .राजेश साळुंके, कार्यकारी संपादक शांतारामभाऊ दुनबळे पञकारीकेतील ज्वलंत वादळ यांना प्रशस्तीपञ देवुन केले सन्मानीत, नाशिक जिल्हा

प्रतिनिधी – शांताराम दुनबळे

यांजकडून नाशिक :-जिल्ह्यातील वार्तापञ शोधांश पञकार गेली दहा वर्षापासुन डॉ .राजेश साळुंके यांनी सुरू केलेले आहे .वार्तापञ शोधांश वृत्तपञ यांच्या माध्यमातून निर्भिड पञकार कार्यकारी संपादक ठोसप्रहार न्युज प्रतिनिधी म्हणून शांतारामभाऊ दुनबळे यांची डॉ . राजेश साळुंके यांना मोलाची साथ मिळाली, राजकारणातील नेते यांची भुमिका असो,शासकीय अधिकारी यांची भुमिका असो , चाणक्य कलामंच ( कलापथक ) पथनाट्याच्या माध्यमातून व वार्तापञ शोधांशच्या माध्यमातून रोखठोक प्रश्न, सडेतोड लिखाण,सामाजिक क्षेत्रातील ज्वलंत प्रश्नाला वाच्या फोडणे व न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने आहोराञ प्रयत्न करत आहेत.म्हणून डॉ . राजेश साळुंके व ठोसप्रहार न्युज प्रतिनिधी शांतारामभाऊ दुनबळे यांचे नाव उल्लेखनीय आहे. महाराष्ट्र राज्य पञकार संघ ,मुंबई यांच्यावतीने नाशिक जिल्हा कोअर कमिटी यांनी कोरोना योद्धा सन्मान पञ देवुन सन्मानित केलेले आहे . डॉ . राजेश साळुंके व ठोसप्रहार न्युज प्रतिनिधी शातांरामभाऊ दुनबळे यांनी कोरोना व्हायरसच्या महामारी संकटकाळी आपल्या वार्तापञ शोधांश मधून जनतेला ह्या रोगापासून वाचविण्यासाठी जनजागृती केली. घरातच रहा, सुरक्षित रहा, असे आवाहन केले . लाॅकडावुन कालावधीत मैञेय सामाजिक उत्क्रांती बहूउद्देशीय सेवा संस्था नाशिकच्या माध्यमातून गोरगरिब व गरजु तसेच परप्रांतियांना अन्नदान व किराणा शिदा वाटप केले आहे. देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी व राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन, वार्तापञ शोधांश मधून जनतेला ह्या रोगापासून वाचविण्यासाठी जनजागृती केली . मुख्य संपादकाची भुमिका पार पाडत असताना, अनेक जबाबदार्या ही त्यांच्यावर होत्या. मैञेय सामाजिक बहूउद्देशीय सेवा संस्था, सर्व जाति धर्मिय वधू वर सुचक व पालक परिचय संघ, ऋणानुबंधन महिला व पुरुष हक्क संरक्षण समुपदेशन केंद्र तसेत इतर व्यवसाय सांभाळुन व निभिॅङ पञकार व शोधांश कार्यकारी संपादक ठोसप्रहार न्युज प्रतिनिधी शातांरामभाऊ दुनबळे यांच्या सहकार्याने कोरोना काळात एकही दिवस सुट्टी न घेता अन्नदान केले आहे. देशात व राज्यात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असताना, कोरोना व्हायरसच्या पाश्वभुमीवर लाॅकडावुन व संचारबदीच्या काळात नागरिकांना घराबाहेर पडणे धोक्याचे झाले होते. अशा परिस्थितीत कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार डॉक्टर ,नर्स, परिचारिका,महसूल,ग्रामविकास ,पोलीस ,पञकार फार्मसिस्ट, सफाई कामगार दिवस राञ आपले कर्तव्य बजावत आहेत.याची दखल घेऊन, महाराष्ट्र राज्य पञकार संघ, मुंबई यांच्यावतीने राज्य अध्यक्ष वसंतराव मुंडे, राज्य संघटक संजय भोकरे, राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे व नाशिक कोअर कमिटीचे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण डोळस, शहर अध्यक्ष दिलीप कोठावदे यांनी पञकार डॉ .राजेश साळुंके व निभिॅङ पञकार ठोसप्रहार न्युज प्रतिनिधी शातांरामभाऊ दुनबळे , सौ.सुचिता साळुंके यांना कोरोना योद्धा म्हणून प्रशस्तीपञ देवुन गौरव करून सन्मानित करण्यात आले आहे. कोरोना योद्धा सन्मानपञ मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वञ अभिनंदन होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button