Amalner:चोऱ्यांचे सत्र थांबेना…! खिश्यातून काढले पैसे आणि मोबाईल..!
अमळनेर येथे विविध प्रकारच्या चोऱ्या सातत्याने होत आहेत.कधी टीव्ही तर कधी दागिने गुरे असे चोरीस जात आहेत. आता तर काय रस्त्यावरील एका व्यक्तीच्या खिशातून मोबाईल, 300 रु रोख असे चोरून नेल्याची घटना गांधलीपुरा येथील आंबेडकर पुतळ्याजवळ घडली आहे .
याबाबत सविस्तर माहिती अशी की गजेंद्र कुमारसिंग पाटील रा पात्री जवखेडा ता.जि. जळगांव हे 4 जाने रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास सुभाष चौकात क्रूझर गाडी क्र.एमएच06, एएफ-520 पार्क करून शेतकी संघ रस्त्याच्या आंबेडकर पुतळ्याच्या मागून पायी जात असताना पाठीमागून एक व्यक्तीने येऊन वरच्या खिश्यात असलेला 10 हजार रु चा मोबाईल व पॅन्टच्या खिश्यातील पाकीट दमदाटी करून हिसकावले.पाकिटात 300 रु ,ड्रायव्हिंग लायसन्स, आधारकार्ड होते. गजेंद्र पाटील यांनी दिलेल्या फिर्यादी वरून अमळनेर पोलिसांत भादवी कलम 392 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शरीफ पठाण करत आहे.






