Amalner

तांदळी येथून अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर मारवड पोलिसांच्या ताब्यात…

तांदळी येथून अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर मारवड पोलिसांच्या ताब्यात…

अमळनेर:- तालुक्यातील तांदळी येथून वाळू वाहून नेणारे ट्रॅक्टर झाडी येथे मारवड पोलिसांनी पकडले असून चालकास ताब्यात घेतले आहे.
भरवस बीटमधील झाडी गावाकडून वाळूची वाहतूक सतत होत असते या अनुषंगाने कारवाई करण्याच्या उद्देशाने मारवड पोलीस ठाण्याचे सपोनि जयेश खलाने, हे. कॉ. संजय पाटील, हे. कॉ. भटूसिंग तोमर, पो.ना. सचिन निकम, पो. कॉ. तुषार वाघ हे खाजगी वाहनाने रवाना होवून सकाळी 7 वाजता झाडी येथे पोहचून बस स्थानकाच्या
आडोश्याला थांबले. भरवस गावाकडून निळ्या रंगाचे स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर येताना
दिसल्याने ते थांबवले असता एम एच 19 एटी 7875 या क्रमांकाच्या ट्रॅक्टर मध्ये अवैध वाळू असल्याचे आढळून आले. चालकास विचारपूस केली असता त्याचे नाव सागर सुका भील वय 19 रा. कळमसरे असल्याचे सांगितले तसेच वाळू ही तांदळी येथून भरली असल्याचे सांगितले. सदर चालकाकडे परवाना नसल्याने 3500 रुपये किमतीची एक ब्रास वाळू व 2.5 लाख किमतीचे स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर मारवड पोलिसांनी जप्त केले असून मारवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button