Faijpur

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दशमाता ग्रुप तर्फे दिव्यांग बांधवांचा सन्मान

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दशमाता ग्रुप तर्फे दिव्यांग बांधवांचा सन्मान

सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल

Faizpur : फैजपूर येथील दशमाचा ग्रुप तर्फे आज दि 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग बांधवांचा त्यांच्या घरी जाऊन शाल श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी दशमाता ग्रुपचे अध्यक्ष तसेच पिंपरुड ग्रामपंचायतचे सदस्य सौ किरण कोल्हे यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी सौ किरण कोल्हे यांनी सांगितले की, जागतिक दिव्यांग दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो दिव्यांग व्यक्तींना उपकाराची सहानुभूती नको मदतीची सहकार्याची आणि विश्वासाची साथ हवी आहे. आजच्या दिनी आपण सर्वांनी दिव्यांग व्यक्तींना सर्वतोपरी सहकार्य करून त्यांना सक्षम करण्याचा संकल्प करूया तसेच दिव्यांग बांधवांना केंद्र शासन व राज्य शासनाकडून अनेक आर्थिक योजना मिळत असत पण त्यांच्या पर्यंत त्या पोहोचवल्या जात नाही त्यासाठी आपण सर्वांनी मदत करून ती त्या दिव्यांग बांधावापर्यंत पोहचवण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचे किरण कोल्हे यांनी सांगितले.
यावेळी त्यांच्या सोबत दिपाली चौधरी, दिव्यांग सेना शहराध्यक्ष नितीन महाजन, सुषमा नितीन महाजन, तालुकाध्यक्ष नाना मोची, जितेंद्र मेढे, विनोद तेली, गोपाळ मिस्त्री व यासह दशमाता ग्रुपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button