Nandurbar

भारतीय ट्रायबल पार्टी (BTP) चे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. उल्हास वसावे व नंदुरबार जिल्हाध्यक्ष के. टी.गावित आणि जिल्हाध्यक्ष सैय्यद रफअत हुसैन भेट

भारतीय ट्रायबल पार्टी (BTP) चे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. उल्हास वसावे व नंदुरबार जिल्हाध्यक्ष के. टी.गावित यांनी नंदुरबार जिल्हा एम.आई.एम कार्यालयवर येऊन जिल्हाध्यक्ष सैय्यद रफअत हुसैन यांची भेट घेतली, या वेळी जिल्हाध्यक्ष रफअत हुसैन यांनी आपल्या पदाधिकारीसह त्यांचे स्वगत केले.

फहीम शेख नंदुरबार

नंदुरबार : नंदुरबार जिल्हा आदिवासी बहुल असुन गुजरात व मध्य प्रदेश सीमेवर असुन तीनही राज्याचा या पट्ट्यात आदिवासी बहुलता असलेले जवळ जवळ नऊ जिल्हे आहे. म्हणुन आवश्यक होते की आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व राजकीयदृष्टय़ा अती मागासलेले दोन्ही समाज एकत्र यावे म्हणुन दोन्ही समाजातील सामजिक व राजकीय क्षेत्रातील बुद्धीजीवी हे एम आई एम व बी टी पी या पक्षांकडे मोठ्या आशेने बघत होते. या विषयी रफअत हुसैन यांनी वेळोवेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार बैर्रीस्टर असदुद्दीन ओवैसी साहेब व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील साहेब यांना सातत्याने परीस्तीथीशी अवगत करुन तकादा लाऊन होते. दोन दिवस अगोदरच खा. ओवैसी साहेबांनी जलील साहेबांना बी टी पी नेत्यांशी चर्चा करुन पुढील कार्यवाहीस हिरवा झेंडा दाखवताच या क्षेत्रात प्रसन्नतेचे वातावरण निर्माण झाले असुन दोन्ही पक्षाचे या नेत्यांची आजच्या या भेटीला महत्व आले आहे. या वेळी एम आई एम जिल्हाध्यक्षसह पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष शोएब खाटिक, नंदुरबार तालुका अध्यक्ष आरिफ हमीद, नवापूर तालुका अध्यक्ष तौसिफ आमलीवाला उपस्थित होते.
या दोन्ही पक्षाचे होणारे गटबंधन भविष्यात कोणाचे राजकीय गणित बिघाडेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button