Dhule

एकात्मिक आदिवासी विकास धुळेच्या इमारतीच्या बांधकामासाठी ६ कोटी २४ लाख रुपये निधी मंजूर आमदार फारूक शाह यांच्या प्रयत्नांना मोठे यश…

एकात्मिक आदिवासी विकास धुळेच्या इमारतीच्या बांधकामासाठी ६ कोटी २४ लाख रुपये निधी मंजूर आमदार फारूक शाह यांच्या प्रयत्नांना मोठे यश…

असद खाटीक धुळे

Dhule : (धुळे दि.२४-११-२०२०) धुळे जिल्ह्यात आदिवासी बांधवांसाठी काही तरी ठोस काम व्हावे आणि एकाच कार्यालयातून आदिवासी समाजाचा विकास व्हावा या संदर्भात एकलव्य आदिवासी विकास संघटना तसेच इतर संघटनाच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यात आदिवासी बांधवांनी आमदार फारूक शाह यांना वेळोवेळी निवेदन देवून वरील बाबतीत गणेश धुळेकर, अजय मालचे, मच्छींन्द्र मोरे, मुलचंद महाराज, राहुल धुळेकर यांनी मागणी केली होती. वरील विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन धुळे शहराचे आमदार फारूक शाह यांनी आज दि. २४-११-२०२० रोजी मंत्रालय मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री नामदार श्री. के. सी. पाडवी साहेब यांची भेट घेऊन त्यांना धुळे जिल्ह्यातील प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विभागाच्या इमारतीच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून दयावा यासाठी मागील काही दिवसापासून प्रयत्न करत होते त्याला आज यश प्राप्त झाले असून लवकरच एकात्मिक आदिवासी विकास धुळेच्या इमारतीच्या बांधकामासाठी ६ कोटी २४ लाख रुपये निधी प्राप्त होणार आहे.

शाह फारूक अन्वर
आमदार, धुळे शहर

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button