Maharashtra

चोपडा धरणगाव रस्त्यावर बेवारस बॅग मध्ये सात किलो गांजा आढळला

चोपडा धरणगाव रस्त्यावर बेवारस बॅग मध्ये सात किलो गांजा आढळला 

चोपडा धरणगाव रस्त्यावर बेवारस बॅग मध्ये सात किलो गांजा आढळला

चोपडा प्रतिनिधी सचिन जयस्वाल
    येथील चोपडा धरणगाव रस्त्यावर अग्रवाल पेट्रोल पंपाच्या समोर बेवारस बॅग आढळून आली यात सुमारे सात हजार रुपये किमतीचा अमली पदार्थ आढळून आला.
      पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहीती अशी की , १३ रोजी दुपारी ३:३० वाजता चोपडा धरणगाव रस्त्यावर अग्रवाल पेट्रोल पंपासमोर रस्त्याच्या बाजूला गवतात एक लाल रंगाची बेवारस बॅग आढळून आली. याबाबत चोपडा शहर पोलीस स्टेशनला वेले येथील विश्वास वसंत सपकाळे यांनी चोपडा शहर पोलिसांना कळविले असता पोलीस नाईक प्रदीप राजपूत, मधुकर पवार यांनी घटनास्थळी जाऊन ती बॅग हस्तगत केली त्यात सुमारे सात किलो गांजा नावाचे अंमली पदार्थ आढळून आला. 
       सहाय्यक पोलिस अधिक्षक सौरभ अग्रवाल , पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मनोज पवार हवालदार मधुकर पवार, सुनील पाटील, पोलीस नाईक रवींद्र पाटील, प्रदीप राजपूत यांनी पंचनामा केला. याबाबत चोपडा शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button