Kolhapur

गोरगरिबांच्या देवदूताला पाठबळ द्या : सौ. नबिला मुश्रीफ : हळदी-कुंकूच्या माध्यमातून साधला माता भगिनींशी संवाद

गोरगरिबांच्या देवदूताला पाठबळ द्या : सौ. नबिला मुश्रीफ : हळदी-कुंकूच्या माध्यमातून साधला माता भगिनींशी संवाद

सुभाष भोसले,कोल्हापूर

गोरगरिब, दीनदलित वंचित व शोषितांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आमदार हसन मुश्रीफ या देवदूताला पाठबळ द्या, असे आवाहन सौ. नबिला अबिद मुश्रीफ यांनी केले.

कागल तालुक्यातील हसुर खुर्द, हसूर बुद्रुक, बोळावी, बोळावीवाडी, ठाणेवाडी, हळदवडे, करंजिवणे, खडकेवाडा, बेळुंकी, नानीबाई चिखली, बस्तवडे, सोनगे, कुरुकली, सुरूपली, शिंदेवाडी येथे हळदी कुंकू व महिलांच्या प्रचार सभांच्या निमित्ताने महिलांशी संपर्क साधला.

सौ. नबिला मुश्रीफ पुढे म्हणाल्या, तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून गोरगरीब महिला कामाच्या निमित्ताने कागलला येतात, या ठिकाणी आमदार मुश्रीफ हे तत्परतेने या सर्वांची काम मार्गी लावतात. कामाच्या पूर्ततेनंतर घरातून बाहेर जाताना त्यांच्या चेहऱ्यावर असलेले समाधान बघून आमचा ऊर भरून येतो.

यावेळी त्यांच्या समवेत मनीषा पाटील, अलका मर्दाने, वर्षा बन्ने, जयश्री सोनवणे, संजना तोडकर रुकसाना जमादार, रुबीना कोल्हापूरे आदी प्रमुख महिला उपस्थित होत्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button