Amalner

Amalner: पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय सावित्रीबाई फुले जयंती साजरी

पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय सावित्रीबाई फुले जयंती साजरी

अमळनेर प्रतिनिधी- पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर येथे 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षा व साने गुरुजी वाचनालयच्या उपाध्यक्षा डॉ प्रा. माधुरी भांडारकर यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले वाचनालयाचे विश्वस्त चंद्रकांत नगांवकर यांनी माल्यार्पण केले..
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार तमाम महिला वर्गांना दिशा देण्यासाठी मार्गदर्शक आहेत त्यांचे विचार देशाला महासत्ता बनतील असे वाचनालयाचे उपाध्यक्षा डॉ माधुरी भांडारकर यांनी सांगितले.
यावेळी पूज्य साने गुरुजी वाचनालयाचे संचालक भिमराव जाधव,
पी. एन भादलीकर, ग्राहक कल्याण फाउंडेशन जळगावचे जिल्हाध्यक्ष हेमंत भांडारकर ,
वाचनालयाच्या कर्मचारी सीमा धाडकर,व कर्मचारी व वाचनप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button