Nashik

वाघाच्या हल्ल्यात जखमी महिलेला वन विभागाची आर्थिक मदत

वाघाच्या हल्ल्यात जखमी महिलेला वन विभागाची आर्थिक मदत

सुनिल घुमरे

नाशिक जिल्हा दिंडोरी तालुक्यात चौसाळे येथील महिला सौ मिराबाई सावळीराम जोपळे या चार महिन्यांपूर्वी शेतात काम करीत असताना अचानक वाघाने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर प्रथम वणी येथील ग्रा डकमीण रुग्णालयात व त्यानंतर नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले होते, त्यांची घरची परिस्थिती अतिशय नाजूक असल्याने त्यावेळेस उपचारासाठी व इतर खर्चासाठी जिल्हा परिषद सदस्य सौ रोहिणी गावीत, ग्रामसेवक संघटना दिंडोरी तालुका, ग्रामपंचायत चौसाळे यांच्यावतीने रु २११००/ मदत करण्यात आली होती.
आज दि १५/५/२०२० रोजी वन विभागाच्या वतीने वन परिक्षेत्र अधिकारी श्री जी पी गांगोडे यांनी त्यांचे कार्यालयीन प्रतिनिधी श्री एस एल सहाणे यांच्या हस्ते रु १२५०००/- धनादेश देण्यात आला यावेळी जिल्हा परिषद सदस्य सौ रोहिणी गावीत यांचे प्रतिनिधी तथा शिवसैनिक श्री सदाशिव गावीत उपस्थित होते वन विभागाचे कर्मचारी श्री जी एल गांगुर्डे, एस आर वाघचौरे हजर होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button