पाल येथे कृषी केंद्र चालकांसाठी अभ्यासक्रमास सुरुवात
सलीम पिंजारी
फैजपूर
दि.११.०२.२०२०
कृषी विज्ञान केंद्र,पाल येथे ४८ आठवड्यांचा कृषी सेवा केंद्र चालकांकरिता राज्यस्तरीय वनामती, नागपूर व आत्मा कार्यालय, जळगांव यांच्या सयूंक्तपणे 11 महिने कालावधीचा देसी(Diploma in Agriculture Extension for input dealers)DAESi कोर्स सुरू करण्यात आलेला आहे या कोर्स चा उदघाटन समारंभ च्या अध्यक्षस्थानी मा. अजित पाटील (सचिव,सा वि म) उपस्थित होते .कृषी चालकांनी नविन तंत्रज्ञान स्वीकारून गुणात्मक वाढ करण्या बाबत मार्गदर्शन केले.श्री.पी एन सरोदे (फार्म मॅनेजर) यांनी शिवार फेरीच्या माध्यमातून उमेदवारांना विविध उपक्रमांची माहिती करून दिली.जिल्ह्यातील एकूण 40 केंद्र चालकांची निवड करण्यात आली असून त्यांना तांत्रिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे तसेच कोर्स पूर्ण केल्यानंतर कृषी निविष्ठा विक्री परवाना प्राप्त करण्यास मदत होणार आहे श्री.संजय महाजन (प्रमुख,के व्ही के)यांनी रोजगाराभिमुख प्रशिक्षण घेऊन उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावा असे मत त्यांच्या प्रस्ताविकमधून केले.या कार्यक्रमाला व्यासपीठावर श्री.साळुंखे(ता.कृ.आ,रावेर)श्री..एल ए पाटील(कृषी अधिकारी,प स ,रावेर)श्री.अशोक झाम्बरे(संचालक, सावीम)श्री.सुधाकर झोपे(मुख्याध्यापक, लोहारा),श्री.अरुण फेंगडे(प्रसारक,देसी कोर्स)
या कार्यक्रमास रावेर,यावल,मुक्ताईनगर व चोपडा येथील कृषी विक्रेते उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.महेश महाजन(पीक सरंक्षण – विषय विशेषज्ञ व देसी कोर्स समन्वयक) यांनी केले तर आभार डॉ.धीरज नेहेते (उद्यानविद्या – विषय विशेषज्ञ) यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी के व्ही के येथील कर्मचारी वर्गाने मेहनत घेतली.






