लॉकडाऊनमुळे आडकलेले ८५० कामगार त्यांच्या राज्यात विशेष रेल्वेने रवाना
प्रतिनिधी सुनील घुमरे
लॉकडाऊनच्या काळात नाशिक शहर,जिल्ह्यातील शेल्टर होम मधील,तसेच नासिकरोड पंचक परिसरातील विलगीकरण प्रक्रियेत असलेले परराज्यातील मजूर,कामगार यांना श्रमिक एक्सप्रेस ने नासिकरोड रेल्वेस्टेशन वरून लखनऊकडे पाठविण्यात आले.याप्रसंगी जिल्ह्याचे अन्न ,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री, ना . श्री छगन भुजबळ यांनी प्रवाशांशी संवाद साधला तसेच त्यांना बिस्किट,पाणी,जेवणाची पाकिटे देऊन विशेष रेल्वेला हिरवा झंडा दाखवत परप्रांतीय नागरीकांना निरोप दिला.रेल्वे सुटल्यावर परराज्यातील प्रवाशांनी जय महाराष्ट्र आणि महाराष्ट्र सरकार जिंदाबाद अशा घोषणा देत प्रशासनाचे आभार मानले.यावेळी जिल्हाधिकारी सुरज मांढरे,पोलिस आयुक्त विश्वास ऩांगरे पाटील यांच्यासह आधिकारी उपस्थित होते.देश म्हणून आपण या संकटाचा एकजुटीने मुकाबला करू शकू याबद्दलचा आत्मविश्वास दुणावल्याची प्रतिक्रीया नाशिकचे जिल्हाधिकारी श्री सुरज मांढरे यांनी व्यक्त केली.






