गुरुद्वारा मधून मोबाईल आणि रोख रक्कम असे एकूण 50 हजारांची चोरी…
अमळनेर शहरातील सिंधी हाऊसिंग सोसायटी मधील गुरुद्वारा मधून गुळ बाजारातील व्यापाऱ्याचे 34 हजार रुपये रोख आणि 15 हजारांचा मोबाईल चोरीस गेल्याची घटना सिंधी कॉलनी येथे घडली आहे.याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबतीत सविस्तर माहिती अशी की, राजकुमार सुमाराम बितराई यांचे गूळ बाजारात लग्नाच्या पत्रावळी विक्री करण्याचा व्यवसाय आहे. सकाळच्या सुमारास ते दुकानात जाण्याआधी सिंधी समाजाच्या सिंधी हाऊसिंग सोसायटी मधील गुरुद्वारात दर्शनासाठी गेले असतांना त्यांच्याकडे असलेल्या पांढऱ्या पिशवीत ज्यात 34 हजार रुपये रोख व 15 हजारांचा एम आय कंपनीचा मोबाईल असताना पिशवी खिडकीजवळ असलेल्या खुर्चीवर ठेऊन नमस्कार करण्यासाठी गेले असता अज्ञात
चोरट्याने गुरुद्वारात घुसून ती रक्कम लंपास केली. पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान सदर पिशवी घेऊन पळताना शेजारील काही व्यापाऱ्यांनी पाहिले आहे.






