Akkalkot

अक्कलकोट तालुक्यातील बहुभूधारक शेतकरी यांनी केली 75 क्विंटल ज्वारी केली दान

अक्कलकोट तालुक्यातील बहुभूधारक शेतकरी यांनी केली 75 क्विंटल ज्वारी केली दान

प्रतिनिधी कृष्णा यादव,अक्कलकोट

अक्कलकोट, दि.18:- कोरोना विषाणूमुळे लागलेल्या संचार बंदीच्या काळात जिल्ह्यातील गरजवंतांना वाटप करण्यासाठी स्वेच्छेने बहुभूधारक शेतकऱ्यांना ज्वारी दान करण्याचे आवाहन सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केलेले होते.
तसेच जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार अक्कलकोट तहसीलदार अंजली मरोड व तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत वरखेलकर यांनी महसूल व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत केलेल्या आवाहनास अनुसरून अक्कलकोट तालुक्यातील सुमारे 172 शेतकऱ्यांनी 75 क्विंटल ज्वारी 4 क्विंटल गहू कोरोना विषाणूमुळे लागलेल्या संचार बंदीच्या काळात जिल्ह्यातील गरजवंतांना वाटप करण्यासाठी स्वच्छेने दान केलेले आहे.

तसेच अक्कलकोट तालुक्यामधील काझीकणबस या गावांमध्ये 24 क्विंटल, किणीवाडी या गावामध्ये 9 क्विंटल, सलगर या गावांमध्ये 27 क्विंटल ज्वारी वाटप साठी दिलेले आहे.
तसेच तालुक्यातील इतर अनेक गावे किणी, मंगरूळ, करजगी, घुंगरेगाव, जेऊर, कडबगाव या गावातील शेतकर्‍यांनी ज्वारी दान केलेली आहे. तालुका कृषी अधिकारी वडखेलकर व त्यांचे सहकारी कृषी अधिकारी विद्याधर वाघमोडे, तोटप्पा बिराजदार, कृषी सहाय्यक नीलकंठ पारे, अभिषेक जोजन, योगेश कटारे, चिदानंद खोबण, सतीश वाघमोडे, बसवराज माने आदी बहुभूधारक शेतकऱ्यांना अनुदान करण्याचे गावोगावी आवाहन केले होते. प्राप्त सदरचे सर्व धान्य नवीन तहसील कार्यालय अक्कलकोट येथे जमा करण्यात आले आहे.

तसेच अक्कलकोट तालुका हा ज्वारी साठी प्रसिद्ध असून तालुक्यातील प्रमुख रब्बी ज्वारी आहे. सोलापूर जिल्ह्यातील बहूभूधारक शेतकऱ्यांनी संचार बंदीच्या काळातील गरजवंतांना वाटपासाठी ज्वारी दान करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. यापुढे ही शेतकर्‍यांनी ज्वारी दान करावे, असे आवाहन अक्कलकोट तहसीलदार अंजली मरोड यांनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button