Maharashtra

बिबी ग्रामवासीयांचे असेही दायित्वमदतीसाठी गोळा केली एक लाख रुपयांची लोक वर्गणी

बिबी ग्रामवासीयांचे असेही दायित्वमदतीसाठी गोळा केली एक लाख रुपयांची लोक वर्गणी

प्रतिनिधी मनोज गोरे

कोरपना तालुक्यातील जिल्हा स्मार्ट ग्राम बिबी येथील ग्रामस्थांनी गरीब लोकांच्या मदतीकरिता एक लाख रुपयाची लोकवर्गणी व दहा क्विंटल धान्य गोळा केले आहे. वेगवेगळ्या उपक्रमात प्रामुख्याने सहभागी होणाऱ्या बिबी ग्रामस्थांनी कोरोनातही लोकसहभाग दर्शवून मदत गोळा केल्याने ग्रामस्थांचे कौतुक होत आहे.
ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रा. आशिष देरकर यांनी पुढाकार घेऊन गावातील लोकांना व्हाट्सअपच्या माध्यमातून आवाहन केले. त्यानंतर लोकांनी प्रतिसाद देत दोन दिवसात जवळपास ५० हजार रुपयांची लोकवर्गणी गोळा केली. त्यानंतर लोकवर्गणी देणाऱ्या देणगीदारांचे नाव ग्रामपंचायतमधून लाऊस्पिकरच्या माध्यमातून गावकऱ्यांना वाचून दाखवल्यानंतर त्याच ठिकाणी गावकऱ्यांनी नगदी ५० हजार रुपये गोळा केले. अशी एकूण १ लाख रुपयांची लोकवर्गणी गोळा झाली असून दहा क्विंटल धान्य सुद्धा गोळा झाले आहे.
याचा उपयोग गावातील रेशन न मिळणाऱ्या गरीब लोकांकरिता होणार आहे. कोरोनाच्या संकटातही गावकरी धावून आल्याने गावकऱ्यांनी गरीब लोकांप्रती आपले दायित्व सिद्ध करून दाखवले आहे.

ज्या लोकांना शासनाकडून विकत व मोफत दोन्ही प्रकारे राशन मिळतात. असे लोकही काही सामाजिक संस्थांकडून किंवा दात्याकडून मदत मिळाल्यानंतर ती घेण्यासाठी रांगेत पुढे असतात. त्यामुळे रेशन मिळत नसलेल्या खऱ्या गरजुंपर्यंत मदत पोहोचत नाही. ज्यांना शासनाकडून रेशन मिळतात अशा लोकांनी मागे राहून जे खरे गरजू आहे अशा लोकांना लाभ मिळण्यास मदत करण्याची गरज असून त्याकरिता प्रत्येकाने प्रत्येक गावात सहकार्य करण्याची गरज आहे.

– प्रा. आशिष देरकर
उपसरपंच, ग्रा. पं. बिबी

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button