Nashik

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त व्ही. एन. नाईक महाविद्यालयात तिरंगा रॅलीचे आयोजन

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त व्ही. एन. नाईक महाविद्यालयात तिरंगा रॅलीचे आयोजन

सुनिल घुमरे नासिक प्रतिनिधी

दिंडोरी : क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालय दिंडोरी येथे भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तिरंगा रॅलीचे राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास मंडळ यांच्या वतीने महाविद्यालयातून दिंडोरी शहरातील विविध भागात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या तिरंगा रॅलीचे उद्घाटन संस्थेचे संचालक आणि महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष श्याम बोडके यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवुन केले याप्रसंगी दिलीप बोडके, प्राचार्य डॉ. संजय सानप , उपप्राचार्य डॉ. सुनील उगले विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. प्रल्हाद दुधाने राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. नाना चव्हाण प्रा. पंकजा अहिरे त्याचबरोबर प्रा. दिलीप कुटे प्रा. राजेंद्र डोईफोडे, प्रा. डॉ. अरविंद केदारे प्रा. डॉ. रूपाली शिंदे प्रा. वैशाली गांगुर्डे प्रा. शिवाजी साबळे, प्रा. दिलीप गांगुर्डे, प्रा. बागूल त्याचबरोबर महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या रॅलीत महाविद्यालयातील मोठ्या संख्येने विद्यार्थी, विद्यार्थिनींनी या रॅलीमध्ये सहभाग नोंदवला. याप्रसंगी घरोघरी तिरंगा उभारण्यासाठी तिरंग्याचे वाटप करण्यात आले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button