Amalner: शिक्षक दिनी अमळनेर मतदारसंघातील साऱ्याच शिक्षकांना केले वंदन
स्मितोदय फाऊंडेशनचा गुरूंच्या ऋणातून उतराई होण्याचा उपक्रम
अमळनेर-डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीदिनानिमित्त शिक्षक दिनी निवडक शिक्षकांचा सन्मान करण्याची प्रथा आहे,मात्र स्मिदोदय फाऊंडेशन या सन्मानासाठी अमळनेर विधानसभा मतदारसंघातील साऱ्याच शिक्षकांना पात्र समजून त्यांना सन्मानाने सन्मानपत्र पाठवून वंदन करीत शुभेच्छा दिल्या आहेत.
स्मितोदय फाऊंडेशनच्या अध्यक्षा माजी आमदार तथा भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा श्रीमती स्मिताताई वाघ आणि सचिव तथा भाजयुमो च्या प्रदेश सचिव सौ भैरवी वाघ पलांडे यांच्या संकल्पनेतून हा आदरयुक्त उपक्रम राबविण्यात आला.सदर सन्मान पत्र मतदारसंघातील सर्वच शासकीय,खाजगी व्यवस्थापनाच्या प्राथमिक,माध्यमिक,उच्चमाध्यमिक आणि कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक वृंदाना प्राप्त झाले असून या अनोख्या वंदनरुपी शुभेच्छाने शिक्षक वृंद सुखावले आहेत.सदर उपक्रमाच्या संकल्पनेबाबत बोलताना स्मिता वाघ म्हणाल्या की लहानपणी पासूनच आपण सर्वच शिक्षक गुरूंचे कार्य आणि महिमा पाहत आलो असून या शिक्षकांमुळेच आपल्या अनेक पिढ्या घडत आल्या आहेत,आमच्या दृष्टिकोनातून जे विद्या दानाचे कार्य करतात ते सारेच शिक्षक वंदनीय असून त्यांनी आजपर्यंत केलेल्या आदर्श कार्यातून उतराई होण्यासाठी आम्ही शिक्षक दिनाचे अवचित्य साधुन सर्वच गुरूंना वंदन करीत शुभेच्छा दिल्या असल्याचे स्मिता वाघ यांनी सांगितले.
वंदन केले कार्य कर्तृत्वाला,,,
वंदन कार्य कर्तृत्वाला या मथळ्याखाली शिक्षक वृंदाना दिलेल्या शुभेच्छा पत्रात म्हटले आहे की विद्येच्या प्रांगणात सरस्वतीच्या कृपेने आपण राष्ट्रकल्याणासाठी अथक
परिश्रमातून नवी पिढी घडविण्याचे मौलिक कार्य करीत आहात.माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती दिनानिमीत्त शिक्षक दिनी आपल्या कार्य कर्तृत्वाला वंदन करतांना आमच्या मनात कृतार्थतेची भावना प्रज्वलीत होत आहे.आपण विद्या प्रदान करीत असलेल्या यज्ञरूपी कार्यास हार्दिक शुभेच्छा असल्याचे स्मितोदय फाऊंडेशनच्या अध्यक्षा स्मिताताई वाघ आणि सचिव
सौ. भैरवी वाघ- पलांडे यांनी यात म्हटले आहे.
सदर उपक्रम राबविण्यासाठी मच्छिन्द्र पाटील , सदाबापू पाटील , राहुल पाटील , घनश्याम पाटील , रविंद्र देशमुख , जितेंद्र साळुंखे , संजय पाटील, योगीराज चव्हाण, शिवाजी राजपूत, विलास सूर्यवंशी , रवींद्र पाटील, दौलत सोनवणे, हिरालाल पाटील, स्वप्निल पाटील, समाधान पाटील , कल्पेश पाटील , भाऊसाहेब पाटील , भिकन दादा पाटील , जयदीप पाटील , जगदीश पाटील , निखिल पाटील , निनाद जोशी, अमोल पाटील, पराग चौधरी आदींचे अनमोल सहकार्य लाभले.






