किणीवाडी येथील गरीब व गरजू कुटुंबातील व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
प्रतिनिधी कृष्णा यादव, अक्कलकोट
अक्कलकोट प्रतिनिधी, दि. 05:- किणीवाडी येथील सरपंच शिवयोगी तांबूळे यांच्या हस्ते गोरगरीब व गरजू कुटुंबातील व्यक्तींना आज किराणा साहित्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. सध्या चालू असलेल्या कोरोना् व्हायरस या विषाणूमुळे संपूर्ण देशात लाॅकडाऊन चालू आहे. त्यामुळे गोरगरिबांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्याने ज्यांना काम केल्याशिवाय गत्यंतर नाही आणि काम केल्याशिवाय दोन वेळचे जेवण मिळत नाही, अशा गरीब व गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तु देण्यासाठी अक्कलकोटचे तहसिलदार अंजली मरोड यांनी आवाहन केल आहे. त्यांच्या आवाहनास प्रतिसाद देत किणीवाडी चे शिवयोगी तांबूळे सरपंच ग्रामपंचायत किणीवाडी यांच्या तर्फे जमेल तेवढा मदतीचा हात म्हणून गरीब व गरजूंना जीवनावश्यक वस्तू (किराणा साहित्य)चे वाटप करून लोकांची उपजीविका भागवण्याचा प्रयत्न केला आहे.
यावेळी सरपंच शिवयोगी तांबूळे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी गावातील श्री दिगंबर रामराव सुरवसे , श्री दत्तात्रय पाटोळे यांना 25 किलो तांदूळ , डाळ , तेलपाकीट तसेच इतर जीवनावश्यक वस्तुची मदत केली यावेळी सरपंच शिवयोगी तांबुळे पोलिस पाटील महेश भरडे , गौरीशंकर नरूने सर , मलीनाथ हुलसुरे सर उपस्थित होते.






