Paranda

एकल महिलांची स्थानिक स्वराज्य संस्थेत स्वतंत्र नोंदणी करण्यात यावी – एकल महिला संघटना व आधार सामाजिक संस्थेची मागणी

एकल महिलांची स्थानिक स्वराज्य संस्थेत स्वतंत्र नोंदणी करण्यात यावी – एकल महिला संघटना व आधार सामाजिक संस्थेची मागणी

सुरेश बागडे

परंडा ( सा.वा ))दि.१४

एकल (विधवा,परित्यक्ता,घट स्पोटिता व प्रौढ कुमारीका) महिलांचे समाजातील जिवनमान उंचावणे,त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळणे,त्यांना विविध संधी उपलब्ध व्हाव्यात, एकल महिलांची लिडरशिप वाढावी,एकल महिलांची शासन दप्तरी स्वतंत्र नोंद नसल्यामुळे त्यांना एकल असल्याचे कागदपत्रे मिळत नाहीत परिणामी त्यांना विविध शासकीय योजनांपासून वंचित राहून हलाखीचे जिवन जगावे लागते म्हणून एकल महिलांची स्थानिक स्वराज्य संस्थेत स्वतंत्र नोंदणी रजिस्टर ठेवण्यात यावे अशा मागणीचे निवेदन एकल महिला संघटना व आधार सामाजिक संस्था परंडा, यांच्या वतीने गट विकास अधिकाऱ्यांना आज दि.१४ रोजी देण्यात आले. एकल महिला संघटना ही मागील पाच वर्षापासून मराठवाड्यातील ४ जिल्ह्यातील १४ तालुक्यातून ३०० गावात काम करते संघटनेचे १६ हजार सभासद आहेत.संघटना एकल महिलांच्या सोबत काम करीत असल्याने त्यांच्या समस्यांचा पुर्ण अभ्यास केला आहेत त्यात प्रामुख्याने रेशन,पेंन्शन,आरोग्य,रोजगार ,घरकुल तसेच विविध शासकीय योजना त्यांच्या पर्यंत पोहचत नाहीत किंबहुना त्यांच्याकडे एकल असल्याचा शासकीय पुरावा नसल्यामुळे त्या योजनांपासून लांब राहतात म्हणून एकल महिलांची स्थानिक स्वराज्य संस्थांत स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र नोंदणी रजिस्टर ठेवावे व येणाऱ्या २६ जानेवारी रोजीच्या ग्रामसभेत तसा ठराव पारीत करावा अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे अशाच मागणीचे निवेदन जिल्हा परीषदेचे कार्यकारी अधिकारी,गटविकास अधिकारी यांना ही देण्यात आले आहे. निवेदनावर संघटनेच्या तालुकाध्यक्षा मंदा पाटील, अनिता नवले,उर्मिला गरड,मंगल शेळके,नौशाद सय्यद,छाया शेळके,रंजना चौधरी,पुजा चौधरी,मंजुषा विधाते,जुल्फिकार काझी,शंकर जाधव आदिंच्या सह्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button