India

आरोग्याचा मुलमंत्र..भूक न लागणे चिकित्सा व उपाय

आरोग्याचा मुलमंत्र..भूक न लागणे चिकित्सा व उपाय

तोंडाची चव गेली असेल तर खायची इच्छा उरत नाही. भूक लागत नाही.
पण आजार लवकर बरा व्हावा, शरीराच्या सगळ्या हालचाली पूर्ववत व्हायला हव्या यासाठी खाणे महत्त्वाचे आहे.
आजारपणात आलेला अशक्तपणा भरून काढायचा असल्यास, आजारपणातून उठल्यावर चौरस आहार घ्यायला हवा.
त्यासाठी भूक वाढावी या करता प्रयत्न केले पाहिजेत.
इतर अनेक कारणांमुळे सुद्धा भुकेवर परिणाम होऊन भूक लागण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.
कधीकधी काही मानसिक व्याधी सुद्धा यासाठी कारणीभूत असतात.
अनेकदा टेन्शन, स्ट्रेस या कारणांचा सुद्धा भुकेवर परिणाम होतो.
पण जास्त जेवण जात नसेल, किंवा भूकच लागत नसेल तर मात्र ती काळजी करण्यासारखी गोष्ट आहे.
जर बरेच दिवस तुमची भूक कमी होऊन तुम्हाला व्यवस्थित जेवण जात नसेल तर तुमचे वजन कमी होण्याची शक्यता असते.
अशा तऱ्हेने वजन कमी होणे हे आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक असते.

लक्षणे

वेगवान आणि स्पष्ट नाटकीय वजन कमी.

कॅलरी आणि खाद्यपदार्थांच्या चरबीयुक्त सामग्रीसह उत्कटतेने व्यत्यय आणणे.

आहार खूळ सडपातळ किंवा जरी असूनही कमी वजन देखावा.

मळमळ कायमस्वरुपी लावत असताना दातांशी वारंवार संपर्क साधल्यामुळे हातावर चापटणे

वारंवार येण्यामुळे गाल सुजतात उलट्या.

थंड आणि ओल्या परिस्थितीत संवेदनशीलता (सिरेबॅलेन्स) मुळे अर्धवट अल्सर

त्वचेचे नुकसान (मुरुम)

अत्यधिक खेळ किंवा शारीरिक क्रियाकलाप

उदास, उदास मूड

अन्नाची अनंत गाळप करणे यासारखे विधी.

उपाय

दिनचर्येत असे बदल करा –

थोड्या-थोड्या वेळाने खा : एकाच बैठकीत पूर्ण जेवण घेण्याऐवजी थोड्या-थोड्या वेळाने खाण्याचा प्रयत्न करा. दिवसातून तीनवेळा खा, त्याने पचन सुधारेल.

आहारात पोषक पदार्थांचा समावेश करा : वजन वाढवणारे पदार्थ खाण्याऐवजी असा आहार घ्या. ज्यात पोषक पदार्थ जास्त असतील. त्याने स्वास्थ्य चांगले होईल. जंक फूड बिलकुल खाऊ नका ते आरोग्यास अपायकारक ठरते.

सर्वांसोबत जेवा : असे म्हटले जाते की सर्वांसोबत खाल्ल्याने भूक चांगली लागते आणि जेवण चांगले जाते. एकट्याने जेवलात तर भूक कमी लागते.

नाश्ता जरूर करा : रोज सकाळी नाश्ता जरूर करायला हवा. त्यात प्रथिनेयुक्त पदार्थ घ्या. सकाळी उठल्यावर दिवसभरासाठी ऊर्जेची गरज असते. रात्रीच्यावेळी हलके फुलके खावे कारण त्यानंतर आपण झोपत असतो.

खूप पाणी प्या : जास्त पाणी प्यायल्याने शरीरातील घाण बाहेर निघते, पोट साफ राहते परिणामी भूक चांगली लागते. पाणी त्वचेला सुंदर करते. दिवसातून किमान 5 ते 6 लीटर पाणी प्यायला हवे.

भूक लागत नसेल तर, डाळींब, आवळा, वेलची, ओवा, आणि लिंबू खावे. या गोष्टी शरीराला लाभदायक असतात. त्यांनी शरीराला आवश्यक अनेक पोषक द्रव्ये मिळतात.

नियमित व्यायाम करा.
व्यसनांपासून दूर राहा.

डॉ किशोर बाळासाहेब झुटे पाटील
( होमिओपॅथिक तज्ञ )

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button