Amalner

?️अमळनेर कट्टा…दगडी दरवाजा सिरीज..पार्ट-2 दिलेल्या मुदतीत दरवाजाचे काम सुरू न झाल्याने आंदोलन धमाक्याला रिकाम्या खुर्चीला हार घालून सुरुवात…!

?️अमळनेर कट्टा…दगडी दरवाजा सिरीज..पार्ट-2 दिलेल्या मुदतीत दरवाजाचे काम सुरू न झाल्याने आंदोलन धमाक्याला रिकाम्या खुर्चीला हार घालून सुरुवात…!अमळनेर :-येथील शहराची ओळख असणारा दगडी दरवाजा चा बुरुज ढासळला होता.त्या पार्शवभूमीवर मा.जिल्हा नियोजन समिती सदस्य पंकज चौधरी यांनी पुरातत्व विभाग,जिल्हाधिकारीसो.,प्रांताधिकारी,मुख्याधिकारी यांचा कडे वेळो वेळी (23/12/2018 व दि 22/07/2019 रोजी पुरातत्व विभागास पूर्व सूचना देत दरवाजा बुरुज ढासळू शकतो असे पत्र/मेल केला.त्यांनतर दि 24/07/2019 ला दरवाजाचा उजवा बुरुज ढासळला)पाठपुरावा करून काम करण्यास भाग पाडले होते .परंतु पुन्हा सदर कामास हेतुपुरस्कर दिरंगाई होत असल्याचा आरोप चौधरी यांनी केला आहे त्यास अनुसरून आज दि.04 रोजी मुख्याधिकारी यांना निवेदन दिले होते.
अमळनेर शहराला सदैव इतिहासाची साक्ष देणारा प्रेरणादायी दगडी दरवाजा सुमारे 2 वर्षांपूर्वी ढासळला असून राजकीय खेळा मुळे की हेतुपुरस्कर दुर्लक्षा मुळे सुमारे ऑक्टोबर 2020 पासून कार्यरंभ आदेश देऊन देखील कामात आज पर्यंत कुठलीही विशेष प्रगती दिसत नाही.मागील काळात संबंधित ठेकेदार यांना फार मोठ्या आजाराला सामोरे जावे लागले याची आम्हास जाणीव आहे. परंतु त्यावर काही तरी मार्ग काढणे आवश्यक असतांना देखील आपल्या विभागा मार्फत विशेष दुर्लक्ष केले जात आहे.येणाऱ्या 10 दिवसात जर युद्ध पातळीवर काम सुरू नाही झाले तर आम्ही उग्र आंदोलन छेडू अश्या आशयाचे निवेदन पंकज चौधरी यांनी दिले होते त्यास अनुसरून आज दि.16/06/2021 पर्यँत प्रशासनाने कुठलीही दखल न घेतल्याने आज नगरपरिषदेस तरुण,जागृत युवा कार्यकर्त्यांनी भेट देत विचारणा केली असता मा. मुख्याधिकारी मॅडम अनुपस्थित होत्या त्यामुळे गांधीगिरी करत मुख्याधिकारीचा खुर्चीला फुलांचा हार घालून सदर शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्नना कडे लक्ष वेधण्यासाठी आज पासून आंदोलनाला सुरवात करत आहोत असे चौधरी यांनी मत व्यक्त केले.मुख्याधिकारी अनुपस्थित असल्याने उपमुख्याधिकारी श्री संदीप गायकवाड यांनी त्यांचा दालनात कार्यकर्त्यासोबत चर्चा केली.प्रसंगी पंकज चौधरी ,माजी उपनगराध्यक्ष गोपी कासार, सामाजिक कार्यकर्ते प्रा.जयश्री दाभाडे,नाविदभाई शेख, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब संदानशिव तथा ब्रिजलाल पाटील,राकेश चौधरी, नाजीमभाई मेंबर,भूषण भोई,निखिल पाटील,तेजस पाटील,राजे संभाजी मित्र मंडळ, शिवशक्ती मित्र मंडळ,जय बजरंग मित्र मंडळ चे मोजके कार्यकर्ते उपस्थित होते.उद्या पासून शहरातील विविध क्षेत्रातील जेष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते ,व्यापारी बांधव यांचा सोबत चर्चा करून वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात येईल व अंदरपुरा,सराफ बाजार ,पानखिडकी,वाडी चौक,कसाली मोहल्ला भागातील नागरिकांचा साठी पाई तरी रस्ता सुरू करण्यात यावा अशी देखील मागणी करण्यात आली.?️अमळनेर कट्टा...दगडी दरवाजा सिरीज..पार्ट-2 दिलेल्या मुदतीत दरवाजाचे काम सुरू न झाल्याने आंदोलन धमाक्याला रिकाम्या खुर्चीला हार घालून सुरुवात...!

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button