Paranda

प्रज्ञाशोध परिक्षेत परंडा तालुक्यातील जिल्हा परिषदेचे चार विद्यार्थी जिल्हयात चमकले

प्रज्ञाशोध परिक्षेत परंडा तालुक्यातील जिल्हा परिषदेचे चार विद्यार्थी जिल्हयात चमकले

सुरेश बागडे

परंडा (सा.वा )दि.१६

धाराशिव जिल्हयात घेण्यात आलेल्या प्रज्ञा शोध परिक्षेत परंडा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेचे चार विद्यार्थी चमकले , या परिक्षेस जिल्हाभरातील १३ हजार ५०० विद्यार्थ्यांनी ही परिक्षा दिली होती . या परिक्षेचा निकाल नुकताच जाहिर झाला असुन यात परंडा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेचे चार विद्यार्थी चमकले . जिल्हयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेला विद्यार्थी प्रज्वल प्रफुल्ल झाडबुके याने १०० गुणा पैकी ९४ गुण मिळवुन जिल्हयात प्रथम आला आहे .

प्रज्वल झाडबुके याने मिळविलेल्या या यशाबद्दल त्याचा केंद्र प्रमुख बबन गवळे व मार्गदर्शन शिक्षक सुजित देशमुख , .आरटीआयचा तालुकाध्यक्ष फारूक शेख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . याप्रसंगी बोलताना केंद्रप्रमुख बबन गवळे म्हणाले की समाजाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी व भावी पिढी घडविण्यासाठी शिक्षण हेच परिवर्तानाचे साधन आहे .परिवर्तणाचा शिलेदार म्हणुन शिक्षकांनी जवाबदारी द्यावी आणि सक्षम असे विद्यार्थी घडवावेत असे केंद्रप्रमुख बबन गवळे यांनी विधार्थ्याच्या सत्कार प्रसंगी बोलताना सांगीतले .

प्रज्ञा शोध परिक्षेत परंडा तालुक्यातील चार मुले जिल्ह्यात प्रज्वल झाडबुके याने ९४ टक्के गुण घेऊन जिल्हयात प्रथम आला तो कार्ला येथील जिल्हा परिषद शाळेचा आहे , उदयन गायकवाड याने ९३ टक्के गुण घेऊन दुसरा आला तो लोणी येथील प्राथमीक शाळेत शिकत आहे . सार्थक गायकवाड याने ९२ टक्के गुण घेऊन तिसरा आला तो प्राथमिक शाळा बंगाळवाडीचा विद्यार्थी आहे . तर विजय सरपळे याने ९१ टक्के गुण घेऊन तो जिल्हयात चौथा आला असुन तो प्राथमिक शाळा वाकडी येथे शिकत आहे .
जिल्हयात प्रथम आलेल्या प्रज्वल
‌झाडबुके याचा केंद्रप्रुख बबन गवळे , केद्र प्रमुख प्रफुल्ल झाडबुके , मार्गदर्श शिक्षक सुजित देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी माजी सरपंच अनुरथ झिरपे , आरटीआयचे तालुकाध्यक्ष फारूक शेख , मानव अधिकार संघटनेचे नेते इकबाल शेख यांच्यासह विद्यार्थी उस्थीत होते .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button