Amalner

हॉटेल पूनमला सील! मी मारल्याचसारखं करतो तू रडल्यासारखं कर

पूनम परमीट रुमला सील! मी मारल्याचसारखं करतो तू रडल्यासारखं कर

प्रतिनिधी जयश्री दाभाडे

आज सुमारे 4 तास अत्यन्त कडक तपासणी करत कर्तव्य दक्ष राज्य उत्पादन शुल्क विभागाने लुल्ला मार्केट मधील हॉटेल पूनम बियरबार वर कारवाई केली ..

काही दिवसांपूर्वी अमळनेर शहरातील काही हॉटेल वर लॉक डाऊन काळात दारू विकल्या मुळे कार्यवाही करण्यात आली होती. यात हॉटेल पूनम ,हॉटेल जनता,हॉटेल पायल आणि इतर परमिट रूम बार चा समावेश होता. वरील हॉटेल सील करण्यात आले होते. परंतु सील करूनही अनेक हॉटेल सुरूच असल्याची तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने आज शहरात अत्यन्त कार्यक्षम आणि कर्तव्यदक्ष अश्या राज्य उत्पादन विभागाच्या वरिष्ठांनी धाड टाकली आणि मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे एकदम कडक शिस्तीत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आले आणि गेले !

फक्त एकाच हॉटेल वर कार्यवाही करण्यात आली, प्रेस नोट देण्यात आली नाही,पोलीस विभागाला विश्वासात घेण्यात आले नाही, माल किती सापडला आणि खरोखर किती होता याची माहिती देण्यात आली नाही,एक ना अनेक प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाले आहेत

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button