Maharashtra

झाडे लावा, झाडे जगवा वृक्षारोपण समारंभ सोनारी येथे २५० झाडे लावुन कार्यक्रम संपन्न

झाडे लावा, झाडे जगवा वृक्षारोपण समारंभ सोनारी येथे २५० झाडे लावुन कार्यक्रम संपन्न

परंडा तालुका प्रतिनिधी सुरेश बागडे

भैरवनाथ अन्नछत्र ट्रस्ट सोनारी व मराठवाडा जन विकास संघ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने श्री क्षेत्र भैरवनाथ मंदिर सोनारी येथे महंत पीर श्री शामनाथजी महाराज, संजयजी मिस्कीन, नायब तहसीलदार श्री मिलींद गायकवाड,बालाजी महाराज बोराडे यंच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

श्री भैरवनाथ अन्नछत्र ट्रस्ट मार्फत समाजोपयोगी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. यावेळी वड, पिंपळ, सीसे, करंज, चिंच, बदाम, जांभूळ असे वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष लावण्यात आले. मराठवाडा जन विकास संघाचे अध्यक्ष अरूण पवार, सहकारी भैरवनाथ अन्नछत्र ट्रस्ट चे सचीव प्रकाश जगताप, सहसचिव अशोक माने यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला.

यावेळी परंडा येथील पत्रकार हजर होते, तसेच अन्नछत्र चे अध्यक्ष महेश कारकर, कोषाध्यक्ष रवींद्र खुळे, अन्नछत्र चे सहसचिव अशोक माने, भीमा घाडगे, सज्जन गोसावी, संतोष भोरे, अविनाश ईटकर, सुरज गर्जे, सागर वायकर, मतीन तांबोळी, बिभीषण पवार, शशीराज फरतडे, डोमगावचे सरपंच सोमनाथ मीस्कीन, ब्रम्हदेव वडेकर, राहुल काळे, आदिनाथ गुळमीरे, सुनील गुळमीरे, नितिन गाढवे, भारत वायकर, दिलीप कारकर, गणेश कारकर आदि उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button