?धक्कादायक… राम मंदिर ट्रस्ट च्या खात्यातून मोठी रक्कम काढली…FIR दाखल…
नुकतेच अयोध्या येथे राम मंदिर निर्माण ची प्रक्रिया सुरू झाली आहे. अत्यन्त धक्कादायक प्रकार म्हणजे, रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र संस्थेच्या बँक खात्यातून मोठ्या प्रमाणात पैसे काढले गेले आहेत.हे पैसे बनावट धनादेशांचा उपयोग करून करून दोन बँकांमधून गेले आहेत.
अयोध्येत राम मंदिर ट्रस्टच्या खात्यातून एकूण 6 लाख रुपये काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. दोन वेळा पैसे काढल्यानंतर तिसर्या वेळी हा प्रकार उघडकीस आला आहे.
राम मंदिराच्या उभारणी साठी जगभरातून कोट्यावधी रुपये भक्त जमा करत आहेत. आहेत.लोक श्रध्दा आणि विश्वासाने या मंदिर निर्माणासाठी पैसा दान करत आहेत.आणि आता याच रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या खात्यातून फसवणूक करण्याचा प्रयत्न आता सुरू झाला आहे.
दरम्यान माहिती अशी की लखनौमधील एका बँकेकडून क्लोन चेकद्वारे बँक खात्यातून 6 लाख रुपये काढून घेण्यात आले.राम मंदिर ट्रस्टने अयोध्या पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली असून पोलिस तपास करत आहेत.
राम मंदिर निर्मितीसाठी कोट्यावधी रुपये बँकेत पोहोचताच श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या खात्यातून फसव्या प्रयत्नांना सुरुवात झाली आहे. लखनौमधील एका बँकेतून क्लोन चेकद्वारे ट्रस्टच्या खात्यातून 6 लाख रुपये काढून घेण्यात आले आहेत. सत्यापन दरम्यान तिसर्या क्लोन चेकमधून माघार घेतली. ट्रस्टने अयोध्या कोतवालीमध्ये एफआयआर दाखल केला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.






