Maharashtra

65 एकर भक्ती सागर येथे कोविड19रुग्णालय उभा करणार  आमदार प्रशांतराव परिचारक

65 एकर भक्ती सागर येथे कोविड19रुग्णालय उभा करणार आमदार प्रशांतराव परिचारक

प्रतिनिधी रफिक आतार

सध्या सर्वत्र कोरोना विषाणूची थैमान चालू आहे सोलापूर मधील रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे व सध्या शहरात बाहेर गावावरून अनेक लोक आज येत आहेत तसेच या लोकांमुळे च पंढरपूर शहरामध्ये सध्या कोरानो विषाणूचे बाधित रुग्ण नुकतेच निदर्शनास आले आहेत तसेच उपजिल्हा रुग्णालय येथे अशा बाधित व्यक्तींना भरती करण्यास अथवा उपचार करण्यास स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवला आहे या पार्श्वभूमीवर भविष्यात शहराची परिस्थिती बिकट झाल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून 65 एकर येते पन्नास खाटांचे रुग्णालय उभा करता येईल का? यादृष्टीने आज आमदार प्रशांतराव परिचारक यांच्यासमवेत नगराध्यक्षा सौ साधनाताई नागेश भोसले उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर पक्षनेते गुरुदास अभ्यंकर ,माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, उपमुख्यअधिकारी सुनील वाळुजकर आरोग्य समिती सभापती विवेक परदेशी, नगर अभियंता नेताजी पवार डॉ,पारस राका यांनी पाहणी केली यावेळी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी नगर परिषदेची सर्वसाधारण सभा घेऊन या रुग्णालयात सर्व सेवा सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने लवकरात लवकर कारवाई करावी अशी सूचना नगराध्यक्ष यांना दिल्या यावर नगराध्यक्ष साधनाताई नागेश भोसले यांनी सोमवार दिनांक एक जून रोजी सकाळी 11 वाजता नगरपरिषद सभागृहामध्ये विशेष सर्वसाधारण सभा आयोजित केली असून या सभेमध्ये यावर चर्चा होऊन मंजुरी मिळाल्या नंतर शहरातील नागरिकांसाठी लवकरात लवकर 65 एकर येते कोविद19 रुग्णालय उभा करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष साधनाताई भोसले यांनी दिली
पंढरपूर नगरपरिषद

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button