कल्याण

कल्याण आधारवाडी येथे रंगला दिवाळी संध्या कार्यक्रम

कल्याण आधारवाडी येथे रंगला दिवाळी संध्या कार्यक्रम

कल्याण प्रतिनिधी
मिलिंद जाधव

ज्येष्ठ नागरिक संघ कल्याण,
अन्नपुर्णानगर आयोजित व महिला मंडळ व अन्नपुर्णानगर मित्र मंडळ यांच्या सहयोगाने कल्याण शहरातील आधारवाडी येथे ‘दिवाळी संध्या’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
नगरसेवक वरूण पाटील, जेष्ठ नागरिक संघांचे विध्याधर देशपांडे ,महिला मंडळाच्या अध्यक्षा रेखाताई पाटील,रमेश दणाने,सुनील चौधरी याच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. नगरातील गायक, कलावंतानी भक्तीगीताने आपल्या सुमधुर आवाजाने कार्यक्रमाची सुरुवात केली. भक्तीगीत,भावगीत,हिन्दी गीते,कोळी गीते सादर करून यावेळी रसिकांना मंत्रमुग्ध केले. शिवाणी पळणीटकर
अरूणकुमार बॅनर्जी, प्रणव साळवी, सुनिल चोणकर, निलम चोणकर, कुमारी खुशी शशिकांत चव्हाण या गायक कलावंतानी गाणी सादर करून नागरिकांची मने जिंकली. यावेळी नगरात जेष्ठ नागरिक संघांची स्थापना केल्याने संस्थापक विद्याधर देशपांडे, सचिव नारायण चव्हाण यांचा विशेष सत्कार करण्यात आला. होम रिवायीज संस्था आयोजित चित्रकला स्पर्धा आयोजन करण्यात आली होते त्या विजेत्या स्पर्धाकांना यावेळी सचिन पाटील व मान्यवरांचे हस्ते बक्षीस देवून गौरवण्यात आले. कार्यक्रमाच्या विशेष सहकार्य बद्दल उत्तम लादे,शिवाजी शेलार कमलाकर भिलारे ,निलेश परदेशी,नितीन काळे ,राहूल शिंदे, प्रशांत नाचणे, तुषार भावे, सर्वेश नाचणे,कुशल पाटील, विश्वास पवार यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचा सांगता अन्नपुर्णानगर आधारवाडी येथे काही काळ येजा व निवासी आसलेले शाहीर विठ्ठल उमप यांच्या आठवणीना उजाळा देवून व त्यांचे लोकप्रिय कोळी गीत गाऊन कारण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत चव्हाण यांनी तर आभार अरूणकुमार बॅनर्जी यांनी केले.

Leave a Reply

Back to top button