Amalner: रणधुमाळी 2024: ही नव्हे राजकीय कुरघोडी… विरोधी उमेदवाराचा सत्कार..!
अमळनेर सध्या राजकीय धामधूम आहे. इथे सत्ते साठी विरोधक उमेदवाराला राजकीय चष्म्यातून पाहून एकमेकांवर कुरघोड्या करण्यात पटाईत असतात. परंतु अमळनेर येथे मात्र एक नवा पायंडा पडत असल्याचे दिसून येत आहे. नुकतेच राजकीय विरोधकांमध्येही एक आदर्श उदाहरण अमळनेरकरांना पाहायला मिळाले .
हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉक्टर रवींद्र बापू चौधरी यांनी डॉ अनिल शिंदे हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जात असताना त्यांचा यथोचित सत्कार करून राजकीय शिष्टाचाराचे दर्शन घडविले.
अमळनेर तालुका एक वैचारिक तालुका असून, येथे राजकीय विरोधकांमध्येही मित्रत्वाचे संबंध दिसून आले. रवींद्र बापू चौधरी यांनी डॉक्टर अनिल शिंदे यांच्या नामांकन रॅलीचे केलेले स्वागत केले आणि डॉ अनिल शिंदे यांनी मोठ्या आदराने स्वीकारले. काल झालेल्या या सत्काराने तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे.
“आम्ही द्वेषची भावना ठेवत नाही आणि माणसं जपणारी माणसे आहोत,” असे चौधरी यांनी स्पष्ट केले.
आदर्श राजकारणाच्या माध्यमातून, रवींद्र बापू चौधरी यांच्या कृतीने जनतेच्या मनात एक सकारात्मक भावना निर्माण झाली आहे.“शिरीष दादा चौधरी जनतेचा आमदार,” असे म्हणत जनतेने त्यांच्या कार्याची प्रशंसा केली आहे.






