Amalner

? अमळनेर नगरपरिषदेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर…इमानदार माजी सैनिक उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांनी योग्य शब्दात दाखविली मुख्याधिकारी यांना “जागा”..दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये सुंदोप सुंदी..

? अमळनेर नगरपरिषदेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर… उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांनी योग्य शब्दात दाखविली मुख्याधिकारी यांना “जागा”

अमळनेर येथील नगरपरिषदेचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. अमळनेर नगरपरिषदेचे उप मुख्याधिकारी संदीप गायकवाड यांनी अमळनेर मुख्याधिकारी ना योग्य ती जागा दाखवत लेखी खुलासा सादर केला आहे. हा विषय अनेक दिवसांपासून चर्चेत आहे.अमळनेर मुख्याधिकारी विद्या गायकवाड यांनी उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांना विविध विषयांवर कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या नोटीस ला उत्तर देत संदीप गायकवाड यांनी नगरपालिकेच्या गोल मोल कारभाराची चांगलीच हजेरी घेतली आहे. विशेष म्हणजे सर्व गोष्टी तांत्रिक माहिती संदर्भात असून अमळनेर नगरपरिषदेत किती मनमानी कारभार चालतो याचा जिता जागता पुरावा च आहे.

यातील आरोप क्र 3 ला उत्तर देतांना चांगलीच धक्कादायक तांत्रिक माहिती उजेडात आली आहे.
यात कनिष्ठ लिपिक श्री संजय सुदाम चौधरी यांना प्रशासन अधिकारी चा कारभार सांभाळत आहे . तसेच मिळकत व्यवस्थापक तसेच औषध निर्माता श्री महेश जोशी यांना मिळकत व्यवस्थापका मार्फत परस्पर मुख्याधिकारी यांना अहवाल सादर करावा प्रकारचे आदेश दिलेले आहेत जे की नियमांना अनुसरून नाहीत.
आर्थिक हित जोपासण्यासाठी सदर नियुक्त्या केल्या असल्याची बातमी ठोस प्रहार ने देखील प्रकाशित केली होती.
वरील आदेश तत्काळ रद्द करावेत व चुकीच्या पदस्थापनेला खत
पाणी घालू नये. अजून ‘कनिष्ठ लिपिक’ श्री संजय सुदाम चौधरी यांनी त्यांचा भंडार विभागाशी काहीही संबंध नसतांना, भंडार लिपिक प्रसाद शर्मा असतांना “सुमारे १ कोटी” रूपयाची भंडार सामुग्री ‘कनिष्ठ लिपिक श्री संजय सुदाम चौधरी यांनी स्वत च्या सहिने नमूद केलेली आहे. जी भंडार सामुग्री कोणासही वितरित केली गेलेली नाही, इमानदार भंडार लिपिक प्रसाद शर्मा याचीच भंडार विभागातून उचल बांगडी करण्यात आली आहे हे आणि असे अनेक आरोप उप मुख्याधिकारी माजी सैनिक संदीप गायकवाड यांनी न पा प्रशासनावर केले आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button