Amalner

तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्या मार्गदर्शनात अमळनेर येथील वाळू वाहतुकीवर छापा…दबंग कारवाई..

? तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्या मार्गदर्शनात अमळनेर येथील वाळू वाहतुकीवर छापा…दबंग कारवाई..

अमळनेर येथे तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्या मार्गदर्शनात अमळनेर येथील वाळू वाहतुकीवर छापा टाकून दबंग कारवाई केली आहे.बोरी आणि पांझरा नदीच्या परिसरात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली आहे.

वाळू तस्करांनी बोरी नदी पात्रात वाळू उपसत असल्याची माहिती मिळताच तहसीलदारांच्या पथकाने छापा ८ टेम्पो व एक ट्रॅक्टर जप्त करून तहसील कार्यालयात जमा करून दंडात्मक कारवाई केली आहे.
अमळनेर येथे सातत्याने वाळू उपसा होत असतो आणि यासंदर्भात महसूल प्रशासन अत्यन्त कठोरतेने सातत्याने कार्यवाही करत असते.गुरुवारी देखील अशीच धडक कारवाई करण्यात आली.

त्यात तहसीलदार मिलिंद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पथक पी एस पाटील मंडळ अधिकारी नगाव बु ,जी आर महाजन तलाठी अमलनेर , आशीष पारधे तलाठी मांडल, प्रथमेश पिंगले तलाठी नगांव बु , हर्षवर्धन मोरे तलाठी हेड़ावे ,धीरज देशमुख तलाठी मठगवहान ,स्वप्निल कुलकर्णी तलाठी गांधली इ तलाठी आणि कर्मचारी यांनी कार्यवाही केली.

त्याचप्रमाणे मांडळ येथे पांझरा नदीत छापा टाकला असतामालक चालक श्री समाधान भास्कर पाटील रा मांडळ यांचे ट्रॅकटर विना नंबर लाल रंगाचे स्वराज कंपनीचे आणि ट्रॉली विना नंबर निल्या रंगाची त्यात 1 ब्रास अवैद्य वाळू मुद्देमाल सह मारवड़ पोलीस स्टेशन ला जमा करण्यात आले आहे.

अश्या प्रकारे दोन वेगवेगळ्या ठिकाणी अमळनेर तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर तलाठी आणि कर्मचारी यांनी वाळू माफियांवर वचक निर्माण केला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button