चिरंजीवीं संघटने तर्फे कल्याण मध्ये फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याची चिमूकल्यानी घेतली शपथ …….
कल्याण प्रतिनिधी
मिलिंद जाधव
फटाके मुक्त दिवाळी ही आगळीवेगळी संकल्पना चिरंजीवी संघटना गेली 5 वर्षे लोकांसमोर,विद्यार्थ्यांसमोर मांडत आली आहे.
चिरंजीवी संघटनेने कल्याण मधील के.एम.अग्रवाल कॉलेज मध्ये कल्याण येथील वस्तीवस्तीनमध्ये फिरून मुलांसोबत संवादसाधून त्यांना फटाके का फोडू नये , फटाके कोणकडून बनवून घेतले जातात , त्यामुळे काय घडत याचे महत्व मुलांना पटवून दिले व विद्यार्थ्यांना फटाक्यांचे दुष्परिणाम काय होऊ शकतात यांची माहिती व्हिडीओ च्या माध्यमातून मुलांना देण्यात आली. असल्याची राज्यप्रवक्त राहुल बनसोडे यांनी दिली .
या कार्यक्रमामध्ये ” आम्ही फटाके फोडणार नाही फोडू देणार नाही ” अशी शपथ ८० ते १०० विद्यार्थ्यांसोबत घेण्यात आली. असे संघटनेचे राज्यसंघटक वैष्णवी ताम्हणकर यांनी सांगितले.
विशेष म्हणजे वडिलांच्या रॅली मध्ये फटाके वाजवण्याला विरोध करणारा केवळ ९ वर्षाचा लहान मुलगा निर्मिक काळे याला ” जागृत बालक “ह्या पुरस्काराने सन्मानित केले.असे संघटनेचे राज्यकार्यवाह राहुल भट यांनी सांगितले.
फटाक्यामध्ये वापरण्यात देणारी दारू ही कोवळ्या व नाजूक हातानी पटापट भरली जाते व फटाके जास्त प्रमाणात तयार करण्यासाठी मोठयाप्रमाणात लहान मुलांना अपहरण केले जाते हे सगळं थांबले पाहिजे मुलांना त्याचं बालपण जगता यावं , शिक्षणाच्या प्रवाहात यावं आणि त्यांचं ध्येय पूर्ण करावं हा चिरंजीवी संघटनेचा मूळ हेतू असल्याचे मत राज्यध्यक्ष सलोनी तोडकरी यांनी सांगितले.
जोपर्यंत फटाक्यांच्या फॅक्टरी बंद होणार नाहीत तोपर्यंत चिरंजीवी संघटना ही मोहीम राबवत राहील.ही लढाई तोपर्यंत लढत असे राज्यसचिव चेतन कांबळे यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे .
